वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य असतात, ज्यांच्या सावलीत कुटुंब सुरक्षित असते. आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. वडीलही सर्वांवर प्रेम करतात, पण आपल्या भावना कोणाशीही शेअर करत नाहीत. वडिलांच्या या अथक प्रयत्नांबद्दल आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी फादर्स डे साजरा केला जातो. आज रविवारी ‘फादर्स डे’ (Fathers day)च्या निमित्ताने त्यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट केली आहे. ही पोस्ट आता व्हायरल झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा चे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) अनेकदा सोशल मीडियावर अनेक मजेदार पोस्ट शेअर करतात. खूप कमी प्रसंग येतात जेव्हा ते भावनिक पोस्ट करतात.
वास्तविक, त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे ‘जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांना विमानतळावर सोडणे आणि बिझनेस ट्रीपवरून परतल्यावर त्यांचे स्वागत करणे माझ्यासाठी नेहमीच खास होते. आज, फादर्स डेच्या निमित्ताने, मला पुन्हा एकदा त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर जाण्याची इच्छा आहे.’
(हे ही वाचा: Father’s Day 2022: या ‘फादर्स डे’ निमित्त वडलांना द्या खास शुभेच्छा!)
अलीकडेच आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या वडिलांशी संबंधित काही पत्रं शेअर केली होती.
(हे ही वाचा: Loan: शेतीसाठी नाही तर हेलिकॉप्टर घेण्यासाठी शेतकर्याने मागितले ६.६ कोटीचे कर्ज)
ही पत्रं नाहीत त्यांच्या वडिलांची आहेत, ज्या त्यांनी १९४५ मध्ये फ्लेचर शाळेत प्रवेश घेण्यासाठी लिहिली होती.
(हे ही वाचा: Optical Illusion: पानात लपली आहे मगर, तुम्ही शोधू शकता का?)
(हे ही वाचा: रस्त्यावर पडून पावसाचा आनंद घेणाऱ्या चिमुकल्याचा video viral; नेटीझन्सकडून मिळतेय पसंती)
ही पत्रं ७५ वर्षे गोपनीय ठेवण्यात आली होती आणि ती गेल्या वर्षीच सार्वजनिक करण्यात आली होती. आनंद महिंद्रा यांना फ्लेचर स्कूलमधील त्यांच्या वर्ग दिनाच्या भाषणात ही पत्रं सुपूर्द करण्यात आली. आनंद महिंद्रा यांचे वडील हरीश महिंद्रा फ्लेचर स्कूलमधून पदवीधर झालेले पहिले भारतीय होते.