Anand Mahindra Shared Video Of Baby : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती व महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा त्यांच्या प्रेरणादायी आणि व्हायरल ट्विटसाठी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. एखादी आनंदाची बातमी असो किंवा एखादा सण, आनंद महिंद्रा नेहमीच एक खास संदेश पोस्ट करून अनेकांना प्रेरणा देत असतात. तर आता नवीन वर्ष सुरू झाले असून आज नवीन वर्षाचा तिसरा दिवस आहे; तर आता याचनिमित्त आनंद महिंद्रांनी नवीन वर्षाचे, नवीन संकल्प कसे पूर्ण करायचे याबाबत सांगत एक पोस्ट लिहिली आहे.
काही दिवसांपूर्वी एका टिकटॉक स्टारचा व्हिडीओ Video) व्हायरल झाला होता. १६ डिसेंबर २०२४ रोजी आई आणि टिकटॉक स्टार डारिया अलिजादे हिने तिच्या बाळाचे आणि तिचे काही क्षण चित्रित करण्यासाठी मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू करून ठेवले. यादरम्यान ती ट्रेंड फॉलो करीत घराची स्वच्छतादेखील करत असते. यादरम्यान तिचे बाळ जमिनीवर बसून तिच्याकडे पाहत असते. जसजसे ती स्वच्छता करत पुढे जाते, तितक्यात तिचे बाळ स्वतःच्या पायांवर पहिल्यांदा उभे राहते. तर हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी पाहिला आणि नववर्षानिमित्त एक खास संदेश सगळ्यांना दिला.
पोस्ट नक्की बघा…
लहान लहान पावले टाका…
आपण नवीन वर्षात नवनवीन संकल्प करतो. तर हे संकल्प पूर्ण करण्यासाठी नक्की कुठून सुरुवात करायची हा प्रश्न आपल्यातील अनेकांना पडतो. पण, आनंद महिंद्रांनी यावर अगदी सोपा उपाय सांगितला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील लहान बाळाला पहिल्यांदा चालताना पाहून त्यांनी व्हिडीओ त्यांच्या अकाउंटवरून रिपोस्ट केला आणि म्हणाले, ‘ नवीन वर्ष सुरू करण्याचा हा एक मार्ग आहे. लहान लहान पावले टाका. तुमचा नवीन संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने ते पहिले पाऊल ठरेल…’ ; अशी त्यांनी कॅप्शन दिली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @anandmahindra या एक्स (ट्विटर)वर शेअर करण्यात आला आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून आई व मुलाच्या नात्याचे विविध शब्दांत कौतुक करत आहेत. तसेच नवीन संकल्प पूर्ण करण्यासाठी या व्हिडीओची मदत घेतल्याबद्दल आनंद महिंद्रांचे कौतुक करताना दिसले आहेत आणि एकूणच सोशल मीडियावर आनंद महिंद्राची पोस्ट पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे आणि प्रचंड व्हायरल होताना दिसते आहे.