महिंद्रा ग्रुपचे चेअरमन उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते त्यांच्या फॉलोअर्ससाठी नवनवीन गोष्टी शेअर करत असतात. तसेच ते अनेक लोकांच्या वेगवेगळ्या जुगांडांचे अनोख्या संशोधनाची दखल घेत असतात. शिवाय ते अनेकदा त्यांचे वैयक्तिक जीवन, व्यावसायिक धोरणे आणि विविध विषयांशी संबंधित ट्विट करत असतात. सध्या त्यांनी असेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधून एक ट्विट केलं आहे.

या ट्विटद्वारे त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट शेअर केली आहे. आनंद महिंद्रा यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील हनीमूनदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते बुद्धिबळ खेळताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “आणि बुद्धिबळाबद्दल बोलताना, मला हे काल #InternationalChessDay निमित्त पोस्ट करायला पाहिजे होते. ग्लोबल चेस लीग दरम्यान मला अनेकदा विचारले जायचे की मी स्वतः बुद्धिबळ खेळतो का. म्हणून मी माझ्या आठवणींचा अल्बम शोधला आणि आग्रा येथील माझ्या हनीमूनचा हा फोटो सापडला.”

ते पुढे लिहितात “नाही, मी खेळत असलेला हा कोणता रोबोटिक बोर्ड नव्हता, मी फक्त माझ्या पत्नीच्या कॅमेरासाठी पोज देत होतो. मी आता माझे कौशल्य ऑनलाइन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आज मी तेव्हा प्रयत्न केलेल्या d4 ऐवजी e4 ने सुरुवात करणार जे मी तेव्हा प्रयत्न केला होता.” आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ग्लोबल चेस लीगचा उल्लेख केला आहे, जी जगातील पहिली आणि सर्वात मोठी अधिकृत फ्रँचायझी बुद्धिबळ लीग आहे आणि टेक महिंद्रा आणि FIDE (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) यांच्यातील तो एक संयुक्त उपक्रम आहे.

नेहमीप्रमाणे आनंद महिंद्रा यांनी ट्विट करताच अनेक नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने मजेशीर कमेंट केली आहे, त्याने लिहिलं आहे, “तुमच्या हनिमूनला तुम्ही चेकमेटचा सराव करत होता, तुम्ही इथे किती यशस्वी झालात हे जाणून घेणे मनोरंजक असेल.”

Story img Loader