महिंद्रा समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. लोकांना नवनवीन गोष्टींमधून प्रेरणा मिळावी, यासाठी महिंद्रा त्यांच्या ट्विटर अकाउंटवर भन्नाट व्हिडीओ शेअर करत असतात. आज कतारमध्ये अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात फिफा विश्वचषक २०२२ चा महामुकाबला रंगणार आहे. हा अंतिम सामना पाहण्यासाठी तब्बल ८० हजारांहून अधिक प्रेक्षकांनी स्टेडियम खचाखच भरलं आहे. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचे जादुई गोल पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तत्पूर्वी, आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
कारण त्यांनी शेअर केलेला व्हिडीओत मेस्सी आहे की मेस्सीचा डुप्लिकेट ? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. पण तुम्ही जराही गोंधळून जाऊ नका. कारण या व्हिडीओत लिओनेल मेस्सी नसून एका नाव्ह्याने तरुणाच्या केसांवर मेस्सीच्या चेहऱ्याची हुबेहुब प्रतिमा साकारली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. महिंद्रा यांनी चा शेअर केलेला व्हिडीओ चार वर्षांपूर्वीचा आहे. कारण, चाहते मेस्सीवर वेड्यासारखं प्रेम करतात, असा संदेश त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिडा विश्वाला देण्याचा प्रयत्न केला आहे. एक अॅंटन न्हाव्ही मोबाईलवर मेस्सीचा फोटो पाहून तरुणाच्या केसांवर मेस्सीची हुबेहुब प्रतिमा साकारताना या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ जरी चार वर्षांपूर्वीचा असला, तरीही तो आज होणाऱ्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी इंटरनेटवर प्रचंड गाजला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत कॅप्शनही लिहिलं आहे. ते म्हणाले, “मला वाटतंय हा व्हिडीओ चार वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळीही फिफा विश्वचषक स्पर्धा सुरु होती. पण आपण आज होणाऱ्या अंतिम सामन्याची प्रतीक्षा करत आहोत आणि मेस्सी त्याचा मधोमध बसला आहे.” मेस्सीच्या चेहऱ्याची हेअर स्टाईल साकारलेला व्हा व्हिडीओ अॅंटन नाव्हीने काही वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र, महिंद्रा यांनी हा व्हिडीओ फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शेअर केला आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओला १६ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर ७ हजार नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईकही केलं आहे. तसंच ५०० जणांनी हा व्हिडीओ रिट्विटही केला आहे.