Anand Mahindra Viral News : महिंद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय राहून नवनवीन ट्वीट्स करत असतात. ट्वीटरवर प्रेरणादायी व्हिडीओ पोस्ट करून लोकांमध्ये जगजागृती करण्याचा ते प्रयत्न करत असतात. नुकतंच महिंद्रा यांनी असाच एक व्हिडीओ शेअर करून लोकांना सतर्क केलं आहे. तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजेंसबद्दल माहितच असेल, ज्याला कृत्रिम बुद्धी असंही म्हणतात. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून हे कौतुकास्पद आहे. परंतु, हे धोकादायकही ठरू शकतं. व्हायरल झालेल्या या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही याचा अंदाज लावू शकता.

आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करत लोकांना केलं सतर्क, व्हिडीओ एकदा पाहाच

मानवाच्या तल्लख बुद्धीनेच आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा जन्म झाला आहे. पण हे माणसांसाठीही धोकादायक असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही या गोष्टींचा अंदाज येईल. हा एक डीप फेक व्हिडीओ आहे, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीनं बनवण्यात आलं आहे, असं एक तरुण या व्हिडीओत सांगताना दिसत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून बोलता बोलता तुमच्या चेहरा कसा बदलला जातो, हे या व्हिडीओ पाहायला मिळत आहे. हा तरुण याविषयी सांगत असताना एक उदाहरणही व्हिडीओत दाखवताना दिसतोय. याचदरम्यान, कधी तो शाहरुख खान, कधी विराट कोहली, तर कधी आयर्न मॅनचा हिरो रॉबर्ट डॉनी जूनियरसारखा दिसतो.

Anusha Dandekar at Priyanka Chopra brother Siddharth sangeet watch video
Video: प्रियांका चोप्राच्या भावाच्या संगीत सोहळ्याला मराठी अभिनेत्रीची हजेरी, ग्लॅमरस लूकची होतेय चर्चा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Samay Raina Joke about Rekha in front of Amitabh Bachchan in kbc 16 fact check
Video: “आपके पास रेखा नहीं है”, समय रैनाने बिग बींची वैयक्तिक आयुष्यावरून उडवलेली खिल्ली? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या सत्य
Rohit Sharma Viral Video of BCCI Awards on Smriti mandhana Question
VIDEO: “माझी बायको बघत असेल…”, विसरभोळ्या रोहित शर्माचं स्मृती मानधनाच्या प्रश्नावर भलतंच उत्तर; नेमकं काय घडलं?
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
vidya balan distributes food and clothes to needy people video viral
Video: गरजूंना वाटले कपडे अन् वडापाव; बॉलीवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “माणुसकी अजून जिवंत आहे”

नक्की वाचा – लग्नमंडपात झोपून ‘अंग लगा दे’ गाण्यावर थिरकली, पाकिस्तानच्या या तरुणीची चर्चा का होतेय? पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

५६ सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या व्हिडीओला @anandmahindra या ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 297.2k व्यूज मिळाले आहेत. तर ६ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आनंद महिंद्रा यांनी नुकतंच एका गरुडाचा व्हिडीओही शेअर केला होता. पाण्यात असणाऱ्या माणसावर गरुड पक्षी हल्ला करण्याच्या प्रयत्न असतो. पण गरुड माणसाच्या जवळ जाताच दिशा बदलतो आणि निघून जातो. त्यामुळे माणसाच्या जीवाला धोका निर्माण होत नाही. हा व्हिडीओ शेअर करत महिंद्रा यांनी लोकांना मोलाचा सल्ला दिला होता. ” कधी कधी आपण किती भाग्यवान आहोत, याची कल्पनाच आपल्याला नसते. आपल्या नकळत आपले संरक्षण केले जाते, आपली काळजी घेतली जाते. अगदी सामान्य वाटणाऱ्या प्रत्येक दिवसासाठीही आपण कृतज्ञ असायला हवे.” असं कॅप्शन त्यांनी गरुडाच्या व्हिडीओला दिलं होतं.

Story img Loader