Anand Mahindra Car Viral Video : देशातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते नेहमीच विविध प्रकारचे भावनिक, प्रेरणादायी व्हिडीओ, फोटो शेअर करत असतात. तर काहीवेळी मनोरंजक गोष्टी पोस्ट करत युजर्सचे मनोरंजन करतात. अशातच त्यांनी एका तरुणाचा भावनिक व्हिडीओ पोस्ट केला आहे जो पाहून तुमच्याही डोळ्यातून आपसूक पाणी येईल.

व्हिडीओत पाहू शकता की, एक गरीब मुलगा सर्वात अलिशान स्पोर्टस कारसमोर उभं राहून सेल्फी घेत होता. पण तितक्यात या कारचा मालक तिथे येतो आणि पुढे काय घडतं तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

व्हिडीओत एक गरीब मुलगा पोर्शे या स्पोर्टस कारसमोर उभं राहून सेल्फी घेत होता. यावेळी त्या कारचा मालक तिथे आला आणि त्याने तरुणाच्या हातातून मोबाईल फिसकावून घेतला, हे पाहून तो तरुण खूप घाबरला, त्याला काय करावे सुचत नव्हते. पण पुढच्याच क्षणी कार मालकाने स्वत: मुलाचं त्या कारबरोबर फोटो सेशन केलं. त्याचे कारबरोबर छान छान फोटो काढले. विशेष म्हणजे त्याला आपल्या कारने फिरवले देखील. तरुणाचा हा प्रेमळ स्वभाव आणि देखवलेली माणुसकी अनेकांना फार आवडली आहे, दरम्यान उद्योगपती आनंद महिंद्रा देखील हा व्हिडीओ पाहून भावूक झाले.

आनंद महिंद्रांची व्हायरल पोस्ट

त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, व्हिडीओ खरंतर एक वर्षापेक्षा जुना आहे. पण मी हल्ली पाहिला आणि पाहून खरंच अवाक् झालो, कारच्या मालकाने गरीब मुलाप्रती दाखवलेली उदारता आणि सहानुभूतीसाठी खूप खूप आभार…

ते पुढे म्हणाले की, एक कार उत्पादक म्हणून पाहताना कार लोकांना किती आनंद आणि सुख देऊ शकतात याची जाणीव यातून होते. मला आशा आहे की, महिंद्राचे आमचे डिझायनर्स आणि इंजिनियर्स सध्या आणि भविष्यातही अशाच रचनात्मक पद्धतीने गाड्यांची निर्मिती करतील. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल होताच युजर्सही त्या कार मालकाचे कौतुक करत आहेत. अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.

Story img Loader