Viral Video: एखादं स्वप्न पूर्ण करताना प्रवासात अनेक संकटं येतात. या संकटांवर आपल्याला एकट्यालाच मात करावी लागते. एखादी गोष्ट मिळविण्यात काहींना खूप लवकर यश मिळतं; तर काही लोकांना एखादी गोष्ट मिळविण्यात खूप संघर्ष करावा लागतो. पण, यातून मार्ग काढणारा त्याच्या आयुष्यात खूप पुढे जातो आणि आपलं ध्येय गाठतो. आज आनंद महिंद्रा यांनी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे; ज्यात एक चारचाकी चालक खडकाळ प्रदेशातून स्वतःचा मार्ग काढताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कन्टेन्ट क्रिएटर जोश कोएलबेल याच्या एक्स (ट्विटर) @Enezator अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला गेला आहे. त्यामध्ये एक अज्ञात व्यक्ती जुनी महिंद्रा जीप चालवीत आहे. पण, अज्ञात गाडीचालकासमोर खडकाळ, खडबडीत रस्ता आहे. मात्र, अनेक खड्ड्यांमधून महिंद्रा जीप बाहेर काढत चालकानं त्याचं कासब दाखवून दिलं. खडकाळ, खड्डे असणाऱ्या ऑफ-रोड रस्त्यावरून गाडी चालविल्यानंतर चालक काहीसा खड्डेविरहीत, चांगल्या रस्त्यावर येताना दिसला. अज्ञात चालकाने कशा प्रकारे गाडी खडकाळ रस्त्यावरून आणली ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…पीठ न मळता पोळ्या करण्यासाठी तरुणांचा जुगाड; मिक्सरच्या भांड्याचा केला असा उपयोग की… VIDEO पाहून हसून व्हाल लोटपोट

व्हिडीओ नक्की बघा…

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पाहिला. तसेच या व्हिडीओची त्यांनी आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी तुलना केली आहे आणि हा व्हिडीओ आज ८ जुलै रोजी शेअर केला आहे. तसेच त्यांनी, “रस्ता कितीही खडतर असला तरीही… तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत नक्कीच पोहोचाल’; अशी कॅप्शन या पोस्टला दिली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांच्या अधिकृत @anandmahindra एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा दर सोमवारी एक मंडे मोटिव्हेशनचा व्हिडीओ किंवा फोटो शेअर करतात आणि एक प्रेरणादायी संदेश इतरांपर्यंत पोहोचवतात; जेणेकरून प्रत्येकाचा सोमवार आणखीन खास होईल. इतर दिवशीही सर्व क्षेत्रांवर त्यांची नजर असते आणि त्यातील काही खास गोष्टी नेमून, त्यावर ते स्वतःचे मत पोस्टद्वारे मांडताना दिसतात.