Anand Mahindra Shared Parent Hack Video : भारतात टॅलेंटची अजिबात कमी नाही. रात्री उरलेल्या भाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ ते जुन्या वस्तूंपासून शोपीस आदी वेगवेगळे जुगाड आपल्यातील अनेक जण करत असतो. त्यामुळे भारतीय आणि देशी जुगाड यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. एखादी गोष्ट सोपी करण्यासाठी, कधी एखाद्या गोष्टीला मजेशीर वळण देण्यासाठी, तर कधी कमी खर्चात जास्त फायदा होण्यासाठी देशी जुगाड केले जातात; तर आता भारतीय नागरिकांचा देशी जुगाड सातासमुद्रापार पोहचला आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra), त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि अचूक निरीक्षणांसाठी ओळखले जातात. सोशल मीडियावरही ते बरेच सक्रिय असतात. आज त्यांना व्हायरल व्हिडीओत एक ‘पालकांचा जुगाड’ (parent hack) दिसला. तर हा व्हायरल व्हिडीओ परदेशातील आहे. कारमध्ये फ्रंट सीटच्या मागील बाजूस एक व्यक्ती टॅबलेट बघण्यासाठी जबरदस्त जुगाड करते. सगळ्यात पहिले ती प्लास्टिक जिपर बॅग घेते आणि पुढे नक्की काय करते, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
‘जुगाड’ मुकूट हिरावून घेण्याचा प्रयत्न…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, व्यक्ती टॅब ठेवण्यासाठी टॅब्लेट आणि फ्रंट सीटचा उपयोग करते. व्यक्ती फ्रंट सीटच्या मागच्या बाजूस प्लास्टिक जिपर बॅग अडकवते आणि त्यात टॅबलेट ठेवते, जेणेकरून गाडी सुरू झाल्यावर टॅबलेट हातात पकडून राहण्याची गरज भासणार नाही आणि प्रवासात मनोरंजनसुद्धा होईल. हा व्हिडीओ आनंद महिंद्रा (Anand Mahindra)यांनी पहिला आणि त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून व्हिडीओ शेअर केला आणि म्हणाले की, “अहो थांबा! दुसरा देश आपल्याकडून ‘जुगाड’ मुकूट हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे का?” अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @visualfeastwang या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता, जो आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी त्यांच्या @anandmahindra या अकाउंटवरून रिपोस्ट केला आहे. पण, व्हिडीओवर नेटकाऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. एक युजर म्हणतोय, ‘माझ्या कारमध्ये आयपॅड होल्डर आहे, त्यामुळे यात कोणतं रॉकेट सायन्स नाही’, तर दुसरा याला इंटरेस्टिंग जुगाड म्हणतोय. तर तिसरा भारतीय युजर म्हणतोय की, ‘आम्ही जुगाड करून जगभरातील लोकांना प्रेरणा देत आहोत, सोशल मीडियाचे आभार’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.