Anand Mahindra Share Video Of Student Who Build Drone Copter : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती व महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा त्यांच्या प्रेरणादायी आणि व्हायरल ट्वीटसाठी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. विविध क्षेत्रांतील अनेक गोष्टींची माहिती ते ट्वीटच्या माध्यमातून देताना दिसतात. तसेच एखाद्या युजरची पोस्ट त्यांना मजेशीर किंवा कौतुकास्पद वाटली की, ते त्या माहितीवर स्वतःचे मत मांडून ती सोशल मीडियावरही अगदी आवर्जून शेअर करतात. तर, आज आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एका विद्यार्थ्याचे कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओ मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील एका हायस्कूलच्या विद्यार्थ्याचा आहे. मेधांश त्रिवेदी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने स्वबळावर सिंगल सीटर (single-seater) ड्रोन कॉप्टर (drone-copter) तयार केले आहे. मेधांश त्रिवेदी यांनी ड्रोन तयार करण्यासाठी तीन महिने काम केले. हा ड्रोन ८० किलो वजनाच्या व्यक्तीला घेऊन अंदाजे सहा मिनिटे उडत राहण्यास सक्षम आहे. आनंद महिंद्रानी (Anand Mahindra) शेअर केलेला मेधांश त्रिवेदी या विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की पाहा.

हेही वाचा…मोठ्यांना जमले नाही ते चिमुकल्यांनी करून दाखवले ! ‘या’ गाण्यावर आतापर्यंत केलेला बेस्ट डान्स; Viral Video पाहून कौतुकाने वाजवाल टाळ्या

पोस्ट नक्की बघा…

ड्रोन कसा उडतो याचे प्रात्यक्षिक दाखवले

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मेधांश त्रिवेदी सिंगल सीटर, ड्रोन कॉप्टर बनवितानाची काही दृश्ये दाखविण्यात आली आहेत. तसेच ड्रोन कॉप्टरमध्ये मेधांश त्रिवेदी बसला असून, ड्रोन कसा उडतो याचे प्रात्यक्षिकसुद्धा दाखविण्यात आले आहे. यादरम्यान सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्याच्या दृष्टीने डोक्यावर हेल्मेटसुद्धा घातल्याचे दिसत आहे. आतापर्यंत तुम्ही ड्रोनद्वारे व्हिडीओग्राफी केली जात असल्याची अनेक दृश्ये पाहिली असतील. पण, मेधांश त्रिवेदी या विद्यार्थ्याने केलेला हा प्रयोग खूप अनोखा आणि कौतुकास्पद आहे, असे म्हणायला हरकत नाही.

सोशल मीडियावर @BRICSinfo या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करून, त्याला, भारतातील हायस्कूलच्या विद्यार्थ्याने स्वनिर्मित ‘ड्रोन-कॉप्टर’ बनवले, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा व्हिडीओ आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी पाहिला आणि त्यांच्या अकाउंटवरून रिपोस्ट करीत लिहिले, “इनोव्हेशनबद्दल बोलायचे नाही. कारण- मशीन कसे बनवायचे याचे ज्ञान इंटरनेटवर उपलब्ध आहे. हे म्हणणे अभियांत्रिकीची आवड धरून, एखादे काम पूर्ण करण्याबद्दल आहे. आपल्याकडे जितके तरुण लोक असतील, तितके अधिक नावीन्यपूर्ण राष्ट्र बनेल”, असे मत त्यांनी मांडले आहे.