Anand Mahindra Viral Video: जर नीट पाहिलं तर तुमच्याही लक्षात येईल की आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत कला आहे. निसर्गाने प्रत्येक गोष्ट इतक्या बारकाईने तयार केली आहे. अशीच एका सर्वत्र पाहायला मिळणारी निसर्गाची देणगी म्हणजे संगीत. अलीकडेच एका ऑस्ट्रेलियन गायकाने स्टेजवर चक्क एका गाजराचे रूपांतर सनईमध्ये करून सर्वांना थक्क केले होते. त्याचे हे कसब पाहून स्वतः आनंद महिंद्रा सुद्धा हा व्हिडीओ शेअर करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चला तर नेमका हा व्हिडीओ आहे काय हे पाहूया…
TEDx टॉक व्हिडिओमध्ये, ऑस्ट्रेलियन संगीतकार लिन्सी पॉलेक यांनी सूरी व ड्रिलिंग मशिनचा वापर करून स्टेजवरच एका गाजराचे क्लॅरिनेट तयार केले. हा व्हिडीओ पाहून एकीकडे प्रेक्षकांमध्ये हशा पिकला तर दुसरीकडे ती गाजराची पुंगी जेव्हा वाजली तेव्हा प्रेक्षक पूर्ण थक्क झाले होते. विशेष म्हणजे पॉलेक या सनईतुन सुंदर लय आणि बीट्स वाजवून दाखवतात .
क्लिप शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की , “यातून काय संदेश मिळाला? संगीत सर्वत्र आहे, तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीत संगीत शोधा”
हे ही वाचा<< “सॉरी मुलींनो, माझी…” रिक्षावर लावलेलं पोस्टर होतंय Viral; नेटकरी विचारतात, आता मुली कशा जगतील?
या ट्विटला आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्यूज आणि पाच हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका वापरकर्त्याने आनंद महिंद्रा यांच्याशी सहमती दर्शवली आणि लिहिले, “तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीमध्ये संगीत शोधा. आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आनंद मिळवा.” अलीकडे आपल्या आवडीच्या कामातही कधी जीव गुदमरतोय असे वाटत असताना हा व्हिडीओ नवी उमेद देणारा आहे असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.