Anand Mahindra explains why you should face your fears : आयुष्यात प्रत्येकाला एकदा तरी अतिशय भीतीदायक क्षणाचा सामना करावा लागतो. विशेषत: जंगलात फिरताना असे भीतीदायक क्षण अनुभवता येतात; जे अनेकदा जीवावर बेतणारे असतात. पण, आयुष्यात अशी एखादी भीतीदायक परिस्थिती ओढवली, तर काय करावे याविषयी देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कानमंत्र दिला आहे. आनंद महिंद्रा यांनी एका आक्रमक हत्तीचा व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यातून त्यांनी भीतीदायक परिस्थितीचा सामना करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आनंद महिंद्रा यांनी एका चिडलेल्या हत्तीचा व्हिडीओ शेअर केला आहे; जो जंगलात चालत असलेल्या दोन व्यक्तींना मारण्यासाठी पुढे सरकतो. पण, त्यांच्यापर्यंत पोहोचताच त्या हत्तीचे मन बदलते आणि तो मागे हटतो. व्हिडीओत बघू शकता की, दोन लोक हत्तीपासून काही अंतर हळू चालत आहेत. त्याच वेळी हत्ती अचानक चिडतो आणि रागाच्या भरात त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे सरकतो. यावेळी आक्रमक हत्तीला पाहून दोघेही तिथेच थांबतात आणि शांतपणे त्यांच्या जागेवरच उभे राहतात. त्यानंतर हत्ती मागे हटतो. अतिशय भीतीदायक आणि जीवघेणी परिस्थिती असतानाही या दोघांनी दाखवलेल्या धाडसाचे लोक कौतुक करीत आहेत. त्या दोन्ही व्यक्तींनी हत्तीच्या आक्रमकपणाला घाबरून पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही. त्याऐवजी त्यांनी हत्तीसमोर उभे राहून, त्या भीतीदायक क्षणाचा सामना केला.

दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले, “तुम्ही भीतीचा सामना करा. सरळ त्या प्राण्याच्या डोळ्यांत पाहा म्हणजे तो निघून जाईल.” त्याच वेळी त्यांनी आयुष्यातील अशाच भीतीदायक क्षणांचा सामना करण्यासाठी एक कानमंत्र दिला आहे. त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, भीतीवर मात करण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे सर्व काही सोडून पळून जा किंवा दुसरा म्हणजे सर्व गोष्टींचा सामना करीत पुढे जा.

तरुणाने उघडले चालते-फिरते कपड्यांचे शोरूम; PHOTO पाहून तुम्हीही व्हाल अवाक्; युजर्स म्हणाले…

दरम्यान,आनंद महिंद्रांच्या या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा कानमंत्र एखाद्या वेळी कामी येऊ शकतो; पण याचा अर्थ असा नाही की, तो प्रत्येक वेळी उपयोगी येईल. उदाहरणार्थ- हा एक चांगला व्हिडीओ आहे; परंतु हत्ती प्रत्येक वेळी असे वागेलच, असे नाही. काही वेळा तो अधिक आक्रमक होईल आणि अडचण निर्माण करू शकेल. दरम्यान, अनेक युजर्सना आनंद महिंद्रांनी दिलेला कानमंत्र आवडला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra shares a video of an angry elephant and give lessons to people how do you face a scary moment in life sjr