Anand Mahindra Mt Kalsubai : पैशाच्या मागे धावताना माणूस आयुष्यातील अनेक गोष्टींना मुकतो. आपल्या करिअरमध्ये तो इतका व्यग्र होतो की, तो अवतीभवतीच्या अनेक सुंदर अनुभव आणि सुखांचा उपभोग घेण्यापासून वंचित राहतो. त्यामुळे आजूबाजूच्या सुंदर, नयनरम्य निसर्गसौंदर्याचाही तो मनमुराद आनंद घेऊ शकत नाही. महाराष्ट्रात इतकी निसर्गरम्य ठिकाणं आहेत, जी प्रत्यक्षात पाहताना आपल्याला स्वर्गीय सुखाच्या आनंदाची अनुभूती मिळते. देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना महाराष्ट्रातील अशाच एका ठिकाणाने भुरळ घातली आहे. आयुष्य जगण्यासाठी कामातून ब्रेक घ्या आणि या ठिकाणाला भेट द्या, असे त्यांनी नमूद केले आहे.

आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाईचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ कळसूबाईच्या उंच शिखरावरून खाली उतरताना शूट करण्यात आला आहे. पर्वतांना स्पर्श करणारे ढग आणि त्यावर पडणारा चमकणारा सूर्यप्रकाश… हे दृश्य पाहताना आपण जणू काही वेगळ्याच जगात असल्याचा भास होतो. आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या निसर्गसौंदर्याने आता नेटिझन्सलाही भुरळ पडली आहे. अनेकांनी व्हिडीओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
Shashank Ketkar
‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…”
Iltija Mufti news
Iltija Mufti : “हिंदुत्व हा एक आजार, कारण..”; रतलामचा व्हिडीओ पोस्ट करत इल्तिजा मुफ्ती यांचं वादग्रस्त वक्तव्य

आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर करीत लिहिले की, हे महाराष्ट्रातील कळसूबाई शिखर आहे. आमच्या इगतपुरीमधील इंजिन कारखान्याजवळ हे ठिकाण आहे. इगतपुरीला अनेकदा गेलो; मात्र डोंगरावरील या ठिकाणाविषयी कधी ऐकले नाही. त्यांनी, असा अद्भुत नजराणा पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडी विश्रांती घ्यावी, असे सुचवले.

आनंद महिंद्रांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, व्हिडीओतील कळसूबाई शिखराजवळील तो सुंदर देखावा पाहून लोकही मंत्रमुग्ध झाले. त्यावर एकाने कमेंट करीत लिहिले की, निसर्गसौंदर्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. तर अनेकांनी निराशा व्यक्त करीत म्हटले की, रोजच्या व्यग्र जीवनात ते अशा क्षणांचा अनुभव घेण्यापासून वंचित आहेत. तर काहींनी अशा ठिकाणी भेट देण्याचे भाग्य त्यांना मिळाले नसल्याचे नमूद केले.

कळसूबाई पर्वत… महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील सर्वोच्च शिखर. तुम्ही कळसूबाई पर्वताचे शिखर सर केले, तर महाराष्ट्रात तुमच्यावर कोणीही उभे राहू शकणार नाही, असे म्हणतात. त्याच्या उंचीमुळे कळसूबाई पर्वताला महाराष्ट्राचा ‘माउंट एव्हरेस्ट’ असे म्हणतात.

Story img Loader