Anand Mahindra Shares Ladakh Football Stadium Photos: प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा आपल्या सोशल मिडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेमध्ये असतात. नेहमी प्रेरणादायी आणि सकारात्माक गोष्टींचे व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करत असतात आणि सर्वांना आश्चर्यचकित करत असतात. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी लडाखमधील नव्या फुटबॉल स्टेडियमचे फोटो शेअर केले आहेत. या मैदानावर एकदा फुटबॉल मॅच पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

देशातील सर्वात उंच ठिकाणावरील स्टेडियम

लडाखमध्ये हे स्टेडियम इतके सुंदर आहे जे नक्कीच एकदातरी पाहिले पाहिजे. खेलो इंडियांतर्गत ओपन सिंथेटिक टॅक आणि एस्ट्रोटर्फ असलेला हा फुटबॉल स्टेडीयम लडाखमध्ये समुद्र पातळीपासून जवळपास ११ हजार फुट उंचीवर आहे आणि देशातील सर्वात उंच ठिकाणावरील हा स्टेडियम आहे. स्टेडियममध्ये एकावेळी १० हजार प्रेक्षकांना समाविष्ट होऊ शकतात. बर्फाळ पर्वतरांगामधील फुडबॉल स्टेडियमचे फोटो पाहून लोक मंत्रमुग्ध झाले आहेत.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?

हेही वाचा – मराठमोळा मिसळपाव ठरला जगात भारी! सर्वोत्कृष्ट ‘पारंपारिक व्हेगन’ पदार्थांच्या जागतिक यादीत पटकावले स्थान

आनंद महिंद्राने शेअर केले लडाखच्या स्टेडियमचे फोटो

आनंद महिंद्रा यांनी या स्टेडियमटचे फोटो रिट्व्ट केले. ” हे फोटो पाहून काही क्षण तुमचा श्वास रोखला जाऊ शकतो पण त्याचे कारण ऑक्सिजनची कमतरता हे नसेल. मला सोफ्यावर बसून क्रिकेट मॅच पाहाण्याऐवजी या स्टेडियमध्ये बसून फूडबॉल मॅच पाहण्याचा आनंद घ्यायला आवडेल.” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – सुंदर आणि मोहक​ दृश्य पाहण्याची दुर्मिळ संधी, नासाने शेअर केला पृथ्वीचा टाईम लॅप्स व्हिडीओ

आनंद महिंद्रा यांनी हे फोटो शेअर केल्यानंतर जवळपास तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी ते पाहिले आहे आणि चार हजारपेक्षा जास्त लोकांनी या त्याला पसंती दिली आहे. तीनशे पेक्षा जास्तवेळा ही पोस्ट रिट्विट करण्यात आली आहे. काही लोकांनी या स्टेडियमचे कौतूक केले. एकाने लिहिले की, हा खरचं श्वास रोखणारे दृश्च आहे. इतक्या सुंदर स्टेडीयममध्ये बसून मॅच पाहण्याचा अनुभव किती रोमांचकारी असू शकता याची कल्पना देखील करता येणार नाही.