Anand Mahindra Shared Tiger vs Duck Video : जंगलात वाघ, सिंह, बिबट्यासारखे खतरनाक प्राणी शिकारीचा शोध घेत असतात. एखादा प्राणी त्यांच्या तावडीत सापडला की, त्याच्यावर हल्ला करून त्याला खाऊन टाकतात. या प्राण्यांचे शिकार करण्याचे डावपेच पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आताही एका भुकेल्या वाघाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत पाण्यात शिरलेला वाघ बदकाची शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पण त्या बदकाने युक्ती लढवली अन् वाघाला कायमचा धडा शिकवला. बदकाने असं नक्की काय केलं की वाघालाही पाण्यातच घाम फुटला, हे या व्हायरल व्हिडीओत पाहिल्यांतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करून एक जबरदस्त मेसेज शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय, यश आणि कधी-कधी अस्तित्व, तुम्ही न घेतलेल्या पुढच्या निर्णयामुळं मिळत नाही. याचसोबत एक स्माईली इमोजी शेअर करत #mondaymotivation लिहिलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक छोट्या तलावात वाघ बदकाला पकडण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्येक वेळी बदक वाघाचा प्रयत्न हाणून पाडतो आणि बदक वाघाला चकवा देऊन पाण्यातून निघून जातो. वाघ बदकावर झडप मारण्याच्या प्रयत्न करत असतानाच तो बदक पुन्हा पाण्यात डुबकी मारतो आणि वाघाच्या तावडीतून सुटका करून घेतो.
नक्की वाचा – Optical Illusion Test: फोटोत १ नंबर कुठं आहे? ९९ टक्के लोकांना उत्तर सांगता आलं नाही
इथे पाहा व्हिडीओ
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. २० सेकंदाच्या या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर ६ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तर ७०० हून अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. एका नेटकऱ्याने व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया देत म्हटलं, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, चार्ल्स डार्विन, दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, वाघाला धक्काच बसला. या व्हिडीओच्या माध्यमातून आनंद महिंद्रा यांनी लोकांना एक प्रेरणादायी मेसेज दिला आहे.