Anand Mahindra shares mosquito killing device : कालपासून मुंबईत पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. देशाच्या बहुतेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यावर जुलै ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येते. त्यामुळे भारतात दरवर्षी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत डेंग्यूची प्रकरणे वाढत असल्याने उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी चिंता व्यक्त केली आहे; परंतु आपल्या पोस्टद्वारे एक व्हिडीओ शेअर करीत उपायही सुचवला आहे. नक्की काय आहे हा उपाय, कोणी लावला याचा शोध? लेखातून सविस्तर जाणून घेऊ…

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत डास मारणारे उपकरण (मशीन) आहे. या उपकरणाचा शोध एका चिनी इंजिनीयरने लावला होता. हे उपकरण डासांना शोधून, ते नष्ट करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की, हे उपकरण गोल गोल फिरून, जिथे डास आहेत तिथे लेसर पॉइंटरच्या मदतीने त्यांना नष्ट करून टाकते. या उपकरणामुळे डास खरंच मारले गेले आहेत या गोष्टीचा पुरावा म्हणून या इंजिनीयरने एका वहीत डासदेखील वेळ लिहून चिकटवून ठेवले आहेत. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ तुम्हीसुद्धा बघा…

nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mumbai municipal administration has cancelled the project to build an underground parking lot near Amarsons Park along the coastal road Mumbai
नागरिकांच्या विरोधानंतर सागरी किनारा प्रकल्पालगतचे वाहनतळ गुंडाळले ; चार वाहनतळांपैकी अमरसन्सचा प्रकल्प रद्द
Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
nagpur leopard latest news in marathi
Video : मादी बिबट्याने हरविलेले पिल्लू अलगद तोंडात धरून…
Conditional possession to eligible tenants on comprehensive list decision of MHADA Vice Chairman
बृहतसूचीवरील पात्र भाडेकरुंना सशर्त ताबा, म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय
robbery at Mayank Jewellers in Vasai Jeweller owner injured
वसईतील मयंक ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; सराफ मालक जखमी, लाखोंची लूट
Toxic semen kill female mosquitoes australia
डासांच्या निर्मूलनासाठी विषारी वीर्याचा वापर; त्यामुळे जीवघेण्या आजारांचा प्रसार कमी कसा होणार?

हेही वाचा…सारे काही प्रसिद्धीसाठी…! रस्त्यावर उडवले ‘त्याने’ पैसे; बाईक-रिक्षातून उतरून पैसे घेण्यासाठी नागरिकांची धडपड… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

तुमच्या घरासाठी आयर्न डोम :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, इंजिनीयरने शोधलेल्या त्याच्या मशीनद्वारे नष्ट झालेल्या सर्व डासांची एका वहीत ‘डेथ नोट’ ठेवली आहे. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी हा व्हिडीओ पाहिला आणि त्यांच्या @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून तो रिपोस्ट करीत त्यांनी या खास यंत्राचे ‘तुमच्या घरासाठी आयर्न डोम’ (Iron dome for your home) असे वर्णन केले. तसेच पुढे लिहिले, “मुंबईत डेंग्यूची प्रकरणे वाढत असताना, एका चिनी माणसाने शोधून काढलेली ही सूक्ष्म तोफ कशी मिळवायची; जी डास शोधून नष्ट करू शकते हे शोधण्याचा मी प्रयत्न करीत आहे”, अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे.

ब्राझिलियन ऑनलाइन वृत्तपत्र मेट्रोपोल्सच्या म्हणण्यानुसार, हे नावीन्यपूर्ण उपकरण हे एका चिनी इंजिनीयरची कल्पना आहे; ज्याने डास शोधण्यासाठी त्याच्या इलेक्ट्रिक कारच्या रडारमध्ये बदल केला. त्यानंतर त्याने रडारला एक पॉवरफुल लेझर पॉइंटर जोडला; जो डासांना शोधून, त्यांना नष्ट करू शकतो. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चिनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Weibo वर शेअर केलेला व्हिडीओ आज आनंद महिंद्रा यांनी पुन्हा रिपोस्ट करीत मुंबईकरांचे डासांपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने उपाय सुचवला आहे. कारण- मुंबईत डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मागील जून व जुलै महिन्यांच्या तुलनेत डेंग्यू, चिकनगुनिया व लेप्टोस्पायरोसिस यांच्या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ नोंदवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आनंद महिंद्रा) Anand Mahindra)यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Story img Loader