महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा हे त्यांच्या हटके आणि वेगवेगळ्या विषयांवर केल्या जाणाऱ्या ट्वीट्ससाठी बरेच चर्चेत असतात. त्यांच्यापेक्षाही त्यांच्या ट्वीट्सची बरीच चर्चा सुरू असते. मग कधी ते हरलीन देओलच्या अप्रतिम कॅचचा व्हिडीओ ट्वीट करतात, तर कधी भारतातील लसीकरण मोहिमेवर ट्वीटमधून भाष्य करतात. कधी ते देशातल्या लाखो आरोग्य सेवकांना शेरोशायरीतून सलाम ठोकतात, तर कधी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लॉकडाउनबद्दल सल्ला देतात. पण अशा सर्वच विषयांवर आनंद महिंद्रांचे ट्वीट येत असल्यामुळे आता त्यांच्या ट्वीटचा असा वेगळा चाहता वर्ग सोशल मीडियावर तयार झाला आहे. आता आनंद महिंद्रा यांनी अजून एक ट्वीट केलं असून त्यामध्ये फियाट कार अवघ्या ९ हजार ८०० रुपयांमध्ये उपलब्ध असल्याची एक जाहिरात त्यांनी शेअर केली आहे!

FIAT New 1100 मॉडेल!

आनद महिंद्रा यांनी फियाट कारच्या एका जुन्या मॉडेलची जाहिरात शेअर केली आहे. या जाहिरातीमध्ये फियाट ११०० मॉडेलची किंमत फक्त ९ हजार ७५० रुपये इतकी लिहिली आहे. ही जाहिरात शेअर करताना “ओह्ह, ते मस्त जुने दिवस” अशा आशयाचा संदेश ट्वीटसोबत लिहिला आहे. त्यांच्या या ट्वीटसरशी नेटिझन्सनी देखील जुन्या व्हिंटेज कार्सच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.

Gaurav More Hindi Film movie poster
फिल्टरपाड्याचा बच्चन हिंदी सिनेमात झळकणार! गौरव मोरेने शेअर केलं पहिलं पोस्टर; म्हणाला, “आशीर्वाद…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
tharla tar mag arjun confess love for sayali at bus stand
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”
Mukesh Ambanis daughter Isha Ambani spotted with colour-changing luxury SUV it is worth Rs 4 core
मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीकडे आहे सरड्यासारखी रंग बदलणारी कार! किंमत ऐकून बसेल धक्का….
badshah post on diljit dosanjh ap dhillon dispute
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
What Sharad Pawar Said About Chhagan Bhujbal ?
Sharad Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना…”
What Sadabhau Khot Said?
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांची खंत; “आम्ही तीन पक्षांचं शेत नांगरून दिलं, आमची वेळ आली तेव्हा बैलांसकट…”

Video : हरलीन देओलचा ‘तो’ सुपरकॅच व्हायरल; आनंद महिंद्रा म्हणतात, “हा स्पेशल इफेक्ट तर नाही ना?”

काय आहे ही जाहिरात?

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेली जाहिरात ६०च्या दशकातली आहे. १९६३ साली FIAT नं ‘न्यू ११००’ हे मॉडेल लाँच केलं होतं. मुंबईच्या कुर्ला परिसरात असणाऱ्या ‘द प्रिमियर ऑटोमोबाईल्स लिमिटेड’ इथे या मॉडेलचं उत्पादन करण्यात आलं होतं. फियाटच्याच जुन्या ‘११००’ मॉडेलचीची ती सुधारीत आवृत्ती होती. हल्लीच्या गाड्यांमध्ये वेगवेगळ्या अत्याधुनिक तंत्राचा कसा वापर केला आहे हे सांगितलं जातं. मात्र, त्या काळी न्यू ११०० मॉडेल लाँच करताना कंपनीनं जाहिरातीमध्ये त्याचा कम्फर्ट आणि परवडणारी किंमत या गोष्टींची जाहिरात केली होती.

 

“हे मॉडेल ११०० चं सुधारीत डिझाईन असून ते अधिक कार्यक्षम आणि आरामदायी आहे. ही फियाट कार एवढी आरामशीर आहे की ती बनवली जरी ४ जणांसाठी असली, तरी त्यामध्ये ५ माणसं सहज बसू शकतात. शिवाय ती खरेदी करण्यासाठी, चालवण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी परवडणाऱ्या दरात आहे”, असं या जाहिरातीमध्ये म्हटलं आहे.

Story img Loader