Neeraj Chopra Viral Video : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या नीरज चोप्राची सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. कारण इंटरनेटवर नेहमीच सक्रीय असणारे महिंद्रा समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी नीरज चोप्राचा एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे. महिंद्रा ट्विटरवर पोस्ट शेअर करून माणसांमध्ये दडलेलं छुपं टॅलेंट जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. अपार मेहनत, काबाडकष्ट करून आणि सतत खेळाच्या मैदानात घाम गाळून यशाचं उंच शिखर गाठता येतं. जगातील सर्वात मोठ्या ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत दिग्गज खेळाडूंच्या मागे अशाच प्रकारची मेहनत दडलेली असते. कारण महिंद्रा यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राचा वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केला आहे. २०२३ मध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी नीरज इंग्लंडमध्ये ट्रेनिंग घेत आहे. “एखाद्या मोठ्या स्पर्धेत विजय मिळवणं कोणत्याच खेळाडूसाठी सोपं नसंत,” अशी प्रतिक्रिया महिंद्रा यांनी नीरजचा व्हिडीओ पाहिल्यानंतर दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा