Ananad Mahindra Tweet: मागील काही काळात जपानी जीवनशैलीतील अनेक गोष्टींनी जगभरातील लोकांना भुरळ घातली आहे. जपानी सुशी सारख्या पदार्थांपासून ते जीवन जगण्याचा आनंददायी फंडा शिकवणाऱ्या इकिगाई या प्रकारापर्यंत प्रत्येक गोष्टीत बहुमोल संदेश दडलेला आहे. आणि आता हळूहळू हे सगळे अर्थ समजून घेण्यात जगाचाही उत्साह वाढताना दिसतोय. एखाद्या संस्कृतीतून काही शिकायचं म्हणजे फक्त त्यांची कला, आहार, साहित्य इतक्याच गोष्टींचं अनुसरण करायचं का? तर नाही. कधी कधी अगदी नगण्य महत्त्वाची वाटणारी गोष्ट सुद्धा मोलाचा फायदा करू शकते. हाच फायदा साध्य करणारी जपानी टेक्नॉलॉजी म्हणजे ‘हे’ टॉयलेट. प्रसिद्ध बिझनेसमन आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर टॉयलेटमध्ये पाणी कसं वाचवायचं हे दाखवणारी जपानी टेक्नॉलॉजी शेअर केली आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये असा दावा केला आहे की, ” जपानमधील अनेक टॉयलेटमध्ये कमोडच्या मागील बाजूस हात धुण्यासाठी असणारे सिंक जोडलेले आहेत जेणेकरून तेच पाणी पुढील फ्लशसाठी पुन्हा वापरले जाईल. यापद्धतीने जपान दरवर्षी लाखो लिटर पाण्याची बचत करत आहे ” या सहज करता येणाऱ्या कल्पनेने प्रभावित होऊन आनंद महिंद्रा यांनी अशा पद्धतीचे प्रयोग भारतातही करण्याची गरज आहे यावर भर दिला. आनंद महिंद्राच्या या ट्वीटवर एकाने उत्तर देत आपण प्रत्यक्ष असा प्रयोग आपल्या घरी केलेला आहे असेही सांगितले. या फोटोचे महिंद्रांनी कौतुक केले आहे.
आनंद महिंद्रा ट्वीट
महिंद्राच्या ट्विटवर नेटकऱ्याची प्रतिक्रिया
हे ही वाचा<< नाल्यात वाहून गेलेले चार महिन्यांचे बाळ जिवंत सापडले? २४ तासांनी अखेरीस समोर येतेय ‘ही’ माहिती
दरम्यान, आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टवर ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि जवळपास सहा हजाराहून अधिक लाईक्स मिळल्या आहेत. अनेकांनी यावर कमेंट करून अशा पर्यायांचा खरोखरच विचार करायला हवा असे म्हटले आहे. काहींनी गमतीत यावर कमेंट करताना आमच्याकडे असे फॅन्सी कमोडच नाहीत असंही म्हटलं आहे. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये व एअरपोर्टवर या पर्यायांचा विचार कारला हवा असेही काहींनी कमेंट बॉक्समध्ये म्हटले आहे.