तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आयुष्य सोपे झाले आहे. घरबसल्या आपल्या सोयीनुसार सर्व गोष्टी करण्याची सुविधा तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तु काही दिवसांमध्ये तर जेवण काही मिनिटांमध्ये आपल्यासमोर हजर होते. आता याही पुढे जाऊन चक्क एटीएम मशीनप्रमाणे फक्त स्कॅनकरून काही मिनिटांमध्ये खाद्यपदार्थ उपलब्ध होण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. बंगळूरमध्ये याची सुरूवात झाली असून याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या मशीनमध्ये ऑर्डर कशी द्यायची जाणून घ्या.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या फुड वेण्डिंग मशीनचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. एटीएमसारखी दिसणारी ही मशीन काही मिनिटांमध्ये इडली आणि मेदूवडा असे दक्षिणात्य खाद्यपदार्थ बनवून देते. बंगळूरमधील ‘फ्रेशशॉट’ स्टार्टअपची ही मशीन आहे. या मशीनमधून फक्त १० मिनिटांमध्ये ७० इडली आणि चटणी बनवून मिळेल अशी सिस्टिम बनवण्यात आली आहे. या मशीनची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
आणखी वाचा : आजीच्या मृत्यूबद्दलच्या Linkedin पोस्टमुळे बड्या कंपनीचा CEO ठरतोय टीकेचा धनी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ :
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ऑडर कशी द्यायची हे सांगण्यात आले आहे. सर्वात आधी मशीनजवळ असणारा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल त्यानंतर फोनमध्ये मेन्यु दिसेल. तुम्हाला हवा असलेला पदार्थ निवडुन पेमेंट करा आणि काही मिनिटांमध्ये तुम्हाला तो पदार्थ मिळेल.
या फुड वेण्डिंग मशीनचे कौतुक करत लवकरच असे मशीन्स मॉल्स आणि एअरपोर्टवर पाहायला मिळतील अशी इच्छा व्यक्त आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली आहे. याबरोबर ‘हे खाद्यपदार्थ FSSAI स्टॅंडर्डसनुसार बनवले जात आहेत आणि यामध्ये ताजे पदार्थ वापरले जात असल्याचे ग्राह्य धरावे का?’ असा प्रश्न त्यांनी कॅप्शनमध्ये विचारला आहे. तसेच यातील खाद्यपदार्थांची चव कशी आहे?असे बंगळूरमधील लोकांना त्यांनी विचारले. या अनोख्या फुड वेण्डिंग मशीनची कल्पना अचंबित करणारी आहे, पण अनेक नेटकऱ्यांना ही कल्पना आवडली नसून त्यांनी या ट्वीटच्या कमेंट्समध्ये याबाबत विरोध दर्शवला.
आणखी वाचा : “दिवाळी तरी…” मुख्यमंत्री शिंदेंना चिमुकल्याने खास वऱ्हाडी भाषेत लिहिलं शेतकऱ्यांचं गाऱ्हाण मांडणारं पत्र
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :
या फुड वेण्डिंग मशीनला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.