उद्योगपती आनंद महिंद्रा आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्याला आश्चर्यचकित करत राहतात. महिंद्रा ग्रुपच्या चेअरमन आनंद महिंद्रा यांचे ट्विटर हँडल मनोरंजक, प्रेरणादायी आणि विनोदी ट्विट्सने भरलेले आहे. सोशल मीडियावर हटके कल्पनांचं कौतुक करणारे आनंद महिंद्रा सर्वसामान्य लोकांमध्येही प्रचंड लोकप्रिय आहेत. असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे, जो सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमधून आनंद महिंद्रांनी आपल्याला एक सुंदर मेसेज दिला आहे.

संकट की संधी? आनंद महिंद्रांचा सवाल

आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या कडेला काही मित्रांचा गृप पावसाचा आनंद घेताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला पावसाच्या साठलेल्या पाण्यात ही मित्रमंडळी उड्या मारत आहेत. दरम्यान हे सगळे रस्त्यावरुन येणाऱ्या गाड्यांना हात दाखवून रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्यातून गाडी नेण्यासाठी हातवारे करतात. तेव्हा काही गाड्या निघून जातात तर काही गाड्या यांचे इशारे बघून पाण्यातून गाडी काढतात. यावेळी हे साचलेलं पाणी या सगळ्यांच्या अंगावर उडतं आणि हे सगळे त्याचा आनंद घेत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रांनी “संकट की संधी? असा सवाल नेटकऱ्यांना विचारला आहे. तसेच हा दृष्टीकोनाचा भाग असल्याचंही म्हंटलं आहे. दरम्यान “संकट आणि संधी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी प्रतिक्रिया यावर एका युजरने दिलीय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – गौतमी पाटीलनं भर कार्यक्रमात फॅनला स्टेजवरच केलं kiss, व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेली ही पोस्ट थोड्या कालावधीतच व्हायरल झाली. या पोस्टवर अनेक कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. दरम्यान, अशा नवनवीन गोष्टीचं लोकांना नेहमीच कुतुहल वाटत असतं. त्यामुळे सोशल मीडीयावर नेटकरी अशा व्हिडीओंना भरपूर पसंती देतात.

Story img Loader