Anand Mahindra shares video of Robot : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. यातील काही व्हिडीओ फार मजेशीर असतात, तर काही तुम्हाला नव्या गोष्टींची माहिती देणारे असतात. अनेकदा ते असे काही व्हिडीओ शेअर करतात, जे तुम्हाला खरंच विचार करायला भाग पाडणारे असतात. यात पुन्हा एकदा त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक रोबोट बाथरूम साफ करताना दिसतोय.

आनंद महिंद्रा यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यावर युजर्स आता संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी या नव्या तंत्रज्ञानावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी यामुळे भविष्यात आपल्याला नोकऱ्या गमवाव्या लागतील, असा युक्तिवाद केला आहे.

video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Meenakshi Seshadri Romantic rain song while she having diarrhea
सेटवर एकच शौचालय, पावसात रोमँटिक गाण्याचं शूटिंग अन्.., मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला अतिसार झाल्यावर चित्रीकरणाचा वाईट अनुभव
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
The little boy was studying in the light of the street lamps
याला म्हणतात चांगले कर्म! रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करत होता चिमुकला, इन्फ्लुअन्सर तरुणाने केले असं काही… VIDEO एकदा पाहाच
do you know advantage of pressing red button in pune
पीएमटी बसमधील या लाल बटणाचा काय उपयोग आहे? VIDEO होतोय व्हायरल

त्यांनी एक्सवर हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, सोमॅटिकचा एक रोबोट जेनिटर; तुम्हालाही एकट्यालाच बाथरूम साफ करावे लागते का? अप्रतिम! ऑटोमेकर्स म्हणून आम्हाला आमच्या कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट वापरण्याची सवय आहे. पण, माझा विश्वास आहे की हे एप्लिकेशन अधिक महत्वाचे आहे. आम्हाला याची गरज आहे… आता.”

आयफोन घेऊन पळाला माकड, फ्रूटी देताच केलं असं काही की..; पाहा मजेशीर VIDEO

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, बाथरूममध्ये एक रोबोट जातो, यानंतर ब्रश आणि वायपर वापरून टॉयलेट सीट आणि बाथरूमची फरशी साफ करताना दिसत आहे. बाथरूम साफ केल्यानंतर, रोबोट पुढचे बाथरूम साफ करण्यासाठी बाहेर जाण्यासाठीचा दरवाजा उघडतो. हा रोबोट अमेरिकेतील सोमॅटिक कंपनीने बनवला आहे. ही कंपनी व्यावसायिक आणि वैयक्तिक जागांसाठी बाथरूम साफ करणारे रोबोट बनवतात.

हा रोबोट जॅनिटर, अनोखे भाग आणि वैशिष्ट्यांसह तयार केला गेला आहे, जो मानवी मदतीशिवाय बाथरूम साफ करण्यास मदत करू शकतो. दरम्यान, एक्सवर या बाथरुम क्लिनर रोबोटचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावर युजर्सदेखील वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने विनोदी पद्धतीने लिहिले की, ‘सर, हे कितीही नावीन्यपूर्ण असले तरी… नंतर मशीन साफ करण्यासाठी तुम्हाला माणसाचीच गरज लागेल.’

दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘यामुळे लाखो स्वच्छता कामगारांच्या नोकर्‍या जातील, कारण ही एक मोठी बाजारपेठ आहे आणि जगभरातील होम क्लिनिंग वस्तूंच्या बाजारपेठेतून २०२४ मध्ये US$40.74 अब्जचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे. तिसऱ्या युजरने लिहिले, ‘माणसांच्या जागी यंत्रमानव आणणे चांगले आहे का? विज्ञानातील विकास पाहणे चांगले आहे, पण कोणत्या किमतीवर?’