इतर वाहनांपेक्षा जास्त किंमत असूनही उत्कृष्ट गुणवत्तेमुळे महिंद्रा बोलेरो कारला मोठी मागणी आहे. बोलेरोने नेहमीच दैनंदिन वापरासाठी एक अष्टपैलू आणि व्यावहारिक वाहन म्हणून आपले मूल्य सिद्ध केले आहे. तथापि, महिंद्रा बोलेरोच्या व्यावहारिकतेला नवीन उंचीवर नेणाऱ्या या ‘हिडन’ वैशिष्ट्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती नसेल.
बिहारमध्ये नुकतीच एक घटना घडली आहे. महिंद्रा बोलेरोमधून अवैध पद्धतीने दारूच्या बाटल्यांची तस्करी करणाऱ्या चार तस्करांना बिहार पोलिसांनी अटक केली आहे. एसयूव्हीमधून इतर राज्यांमध्ये दारूची तस्करी करणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, ज्या पद्धतीने ही तस्करी केली जात होती तिने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. तस्करांनी दारूच्या बाटल्या त्यांच्या महिंद्रा बोलेरोच्या सडपातळ छताच्या वर एका स्कूप्ड हाउसिंगमध्ये लपवून ठेवल्या होत्या. या स्कूप्ड हाऊसिंगमध्ये १७२.८ लीटर दारू लपवण्यात आली होती.
Photos : तुमच्या ओळखपत्रावर कोणी दुसरी व्यक्ती तर Sim Card वापरत नाही ना? असं करा ब्लॉक
विशेष म्हणजे, महिंद्रा बोलेरोवरील हे रूफ टॉप हाउसिंग वैशिष्ट्य कंपनीने तयार केलेलं नसून तस्करांनी स्वतः त्यांच्या बोलेरोच्या छतामध्ये बदल करून ते तयार केले आहे. मात्र दिसताना तो वाहनाचाच एक भाग असल्याचे दिसते.
दरम्यान, ही बातमी समजताच उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी यासंबधी एक ट्विट केले आहे. महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “दुर्दैवाने हे लोक चुकीच्या मार्गावर गेले. अन्यथा ते कदाचित चांगले ऑटोमोटिव्ह डिझाइन इंजिनीअर होऊ शकले असते!!”