सुप्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते सोशल मीडियावरही बऱ्याचदा त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत राहतात. अनेकदा व्यवसाय किंवा जीवनाबद्दल प्रेरणात्मक तर कौतुकास्पद गोष्टी पोस्टमध्ये शेअर करत असतात, तर आज त्यांनी पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. आयआयटी बॉम्बेच्या काही सदस्यांचे त्यांनी कौतुक केले आहे आणि जगातील पहिली फोल्डेबल डायमंड फ्रेमची ई-बाईक याची झलक त्यांच्या पोस्टमधून दाखवली आहे.

आनंद महिंद्रा यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत. यात त्यांनी काळ्या रंगाचे टीशर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे आणि एका अनोख्या सायकलवर ते बसलेले दिसत आहेत. पण, ही सायकल नसून ई-बाईक आहे ; जिचे नाव हॉर्नबॅक (Hornback) असे आहे. सुरुवातीला पहिल्या फोटोत आनंद महिंद्रा त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून ई-बाईक बाहेर काढत आहेत. त्यानंतर ई-बाईक फोल्ड केलेली असते, त्यामुळे ई-बाईक जमिनीवर ठेवून त्याची रचना करून घेतात. तसेच नंतर ई-बाईकवर बसून त्यांचा आनंद घेताना दिसतात. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या खास ई-बाईकची झलक एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघाच…

Who will win the presidential election between Kamala Harris and Donald Trump
अमेरिकेतील निवडणूक कोण जिंकणार?
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Minu Muneer
Minu Muneer : “तो खोलीत आला आणि बेडवर खेचून…”, मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा सहकलाकारांवर गंभीर आरोप!
japans tomiko itooka news
Tomiko Itooka : जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती कोण? ‘या’ महिला गिर्यारोहकाने पटकावला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा किताब!
writer Winston Groom Forrest Gump An unknown novel after the hit movie
स्मरण-टिपण: गाजलेल्या सिनेमानंतरची अपरिचित कादंबरी…
What happened to South Asian University after the Chomsky case
‘चॉम्स्की प्रकरणा’तून साउथ एशियन युनिव्हर्सिटीचे काय झाले?
Death anniversary of film industry actor director singer M Vinayak
मला उमगलेले माझे दादा!
Thane, Uddhav Balasaheb Thackeray shiv sena, Poster War Erupts Between Thackeray and Shinde group Shinde group, eknath shinde shiv sena,
ठाण्यात दोन्ही शिवसेनेत पोस्टर वॉर, उबाठाच्या पोस्टरला शिंदे सेनेकडून पोस्टरने उत्तर

हेही वाचा…घरातले काम सोडून क्रिकेट पाहण्यासाठी गेला तरुण; लक्षात आल्यावर आईसाठी बोर्डवर लिहला संदेश, फोटो पाहून हसू आवरणार नाही

पोस्ट नक्की बघा :

फोल्डेबल डायमंड फ्रेमची ई-बाईक :

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या ई-बाईकचे फोटो शेअर करून लिहिले की, आयआयटी बॉम्बेच्या काही सदस्यांचा आपल्याला पुन्हा एकदा अभिमान वाटेल. त्यांनी जगातील पहिली फोल्डेबल डायमंड फ्रेमची ई-बाईक (foldable diamond frame e-bike) तयार केली आहे. ई-बाईक इतर कंपन्यांच्या फोल्डेबल बाईकपेक्षा ३५ टक्के अधिक कार्यक्षम आहे, तर ही एकमेव अशी बाईक आहे ; जी फोल्ड केल्यानंतर उचलावी लागत नाही. तसेच ऑफिस कंपाउंडभोवती फिरण्यासाठी त्यांनी स्वतः एक हॉर्नबॅक एक्स १ (HORNBACK X1) विकत घेतली आहे. तसेच, ई-बाईकच्या स्टार्टअपमध्ये आनंद महिंद्रा यांनी गुंतवणूक केली आहे, असा खुलासादेखील त्यांनी केला आहे. तर ई-बाईक हॉर्नबॅक ॲमेझॉन तसेच फ्लिपकार्टवरही उपलबध आहे, असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत @anandmahindra एक्स (ट्विटर) अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी ई-बाईकची झलक आणि त्याची वैशिष्ट्ये सांगणारी पोस्ट लिहिली आहे. तर अनेक जण पोस्ट पाहून ई-बाईकची किंमत विचारत आहेत. तर काही जण आयआयटी बॉम्बेच्या सदस्यांच्या या उत्तम कामगिरीबद्दल कौतुक करत आहेत. तसेच आनंद महिंद्रा यांचा अनोखा लूक पाहून त्यांचीसुद्धा प्रशंसा करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.