Anand Mahindra Tweet: लग्न म्हंटलं की कुठे चिडलेले काका, रुसलेले भाऊजी अशी मंडळी सर्रास पाहायला मिळतात. कोण कधी आणि कशावरून चिडेल याचा अजिबात अंदाजही लावता येत नाही. अशाच एका लग्नात नवऱ्याचे मित्र इतके पेटले होते की त्यांनी भर मांडवात अक्षरशः धुमाकूळ घातला. कारण काय तर आपल्याला लग्नात दुसऱ्यांदा पापड वाढला नाही. विश्वास बसत नाही ना? पण केरळमध्ये घडलेला हा प्रसंग पूर्णपणे खरा आहे. स्वतः आनंद महिंद्रा यांनीसुद्धा या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नव्हे तर हा भन्नाट प्रकार पाहून महिंद्रा यांनी मजेशीर स्पर्धा सुरु केली आहे. महिंद्रा यांच्या अनेक फॉलोवर्ससह रितेश देशमुख याने सुद्धा कमेंट करून या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. चला जाणून घेऊ काय आहे हा नेमका प्रकार?
केरळच्या अलप्पुझा जिल्ह्या लग्नाच्या पंगतीत आणखी पापड मागितल्यावर त्यांना नकार देण्यात आला, यावरून हा भयानक वाद झाला. यावरून सुरुवातीला आपापसात वादावादी झाली, मात्र काही वेळातच त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रा यांनी या प्रकरणावर भाष्य करत आपण खरंच काहीवेळा अतुल्य भारत ही उपमा सिद्ध करतो असे म्हंटले आहे. तसेच यावरून आपण एक नवा शब्द सुरु करू शकतो पापडयुद्ध, पापडधमाका, A Pappatamasha’ ‘Pappaplosion’ असे शब्द महिंद्रांनी स्वतः सुचवले आहेत तर तुम्हीही यावर शब्द सुचवा असेही म्हंटले आहे.
रितेश देशमुख म्हणतो…
अनेक युजर्सप्रमाणे बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याने कमेंट करून ‘पापढिशुम’ असा शब्द सुचवला होता. आनंद महिंद्रा यांनी रितेशच्या कमेंटवर प्रतिक्रिया देत हा उपक्रम आणखीनच रंजक होतोय असे म्हंटले.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात, त्यांनी सुरु केलेल्या या भन्नाट स्पर्धेत तुम्हाला कोणता शब्द सुचतोय का कमेंट करून नक्की सांगा .