महिंद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असतात. ते सतत नवनवीन सोशल मीडिया ट्रेंड, देशी जुगाड यासारखे व्हायरल व्हिडीओ शेअर करत असतात. एवढे मोठे उद्योगपती आपल्या कामाच्या व्यापातून ट्विटरवर सक्रिय असतात, या गोष्टीचं अनेक नेटकऱ्यांना कौतुक वाटतं. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या असाच एक व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे, जो पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केलं आहे. कारण एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील उसाचा ट्रॅक्टर बाहेर काढतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ @devkate_bala नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही पाहा- भररस्त्यात बाईकवरुन जाताना जोडप्याला किस करण्याचा मोह आवरला नाही; Viral Video पाहून नेटकरीही भडकले

हा व्हिडीओ शेअर करताना त्याने तो व्हिडीओ आनंद महिंद्रा यांना टॅग केला असून त्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘आनंद महिंद्रा आणि महिंद्रा ग्रुपचे मी मनापासून आभार मानतो. महिंद्रा 265DI 35HP हा ट्रॅक्टर १९८८ मध्ये खरेदी केला होता. आता हा ट्रॅक्टर ३५ वर्षांचा झाला आहे, तरीही तो चांगल्या पद्धतीने काम करत आहे ही आश्चर्याची बाब असून, या ट्रॅक्टरच्या मदतीने मी १२ टन उसाने भरलेली ट्रॉली उसाच्या शेतातून घेऊन जात आहे.’

या व्यक्तीने हे ट्विट उद्योगपती आनंद महिंद्रा यांना टॅग केलं आहे. तर नेहमीप्रमाणे महिंद्रा यांनी त्या ट्विटची दखल घेत त्यांनी त्या व्यक्तीला उत्तर दिलं आहे. आनंद महिंद्रा यांनी त्या शेतकऱ्याला रिप्लाई देताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘आम्हाला सर्वात जास्त आनंद तेव्हा होतो, जेव्हा आमचे ट्रॅक्टर तुमच्या आयुष्यात दीर्घकाळ साथ देतात.’ आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट रिट्विट करताच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.

हेही पाहा- भूकंपामुळे उद्धवस्त झालेल्या तुर्कस्तानात बचाव पथकाला सापडला पैशांचा खजिना; घटनेचा Video Viral

आतापर्यंत हा व्हिडीओ जवळपास या १ लाख ५० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर १० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी महिंद्राच्या ट्रॅक्टरची प्रशंसा केली, तर काही वापरकर्त्यांनी सांगितले की ओव्हरलोडिंग धोकादायक असू शकते. तर आणखी एका नेटकऱ्याने आनंद महिंद्राने सामान्य शेतकऱ्याच्या ट्विटची दखल घेतली हे खरचं कौतुक करण्यासारखं असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra took note of the farmers tweet the video of him taking out the sugarcane tractor went viral jap
Show comments