आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. कतृत्ववान लोकांना ते प्रोत्साहन देतात. सध्या आनंद महिंद्रा यांचे एक ट्विट व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने महिंद्राची नवीन एक्सयूव्ही ७०० विकत घेतली. या व्यक्तीसोबत त्यांची मुलगी देखील होती. एक्सयूव्ही पाहून चिमुकल्या मुलीचा आनंद गगनाला मावेनासा झाल्याचे दिसून येत आहे. यावर आनंद यांनी दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

थोटा श्रीकांत यांनी महिंद्राची नवीन एक्सयूव्ही ७०० विकत घेतली. ही गाडी घेताना त्यांनी शोरूममध्ये काढलेले त्यांचे काही छायाचित्र ट्विटरवर प्रसिद्ध केले आहेत. यात श्रीकांत वाहनाच्या एका बाजूस उभे आहेत तर त्यांची मुलगी ही कारच्या दुसऱ्या बाजूला उभी आहे. कारचा दरवाजा खोलताना या मुलीच्या चेहऱ्यावर निखळ आनंद तुम्हाला दिसून येईल. मुलीची प्रतिक्रिया पाहून आनंद महिंद्रा यांना ट्विटरवर पोस्ट करण्यावाचून राहिले नाही.

(भारतानंतर आता ‘या’ देशातही पबजी, टिकटॉक होणार बॅन)

श्रीकांत यांनी आनंद महिंद्रा यांना टॅग करून पोस्ट शेअर केली आहे. एक्सयूव्ही ७०० घेतल्यानंतर माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद तुम्ही पाहा, असे श्रीकांत यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. यावर आनंद महिंद्रा यांनी देखील ट्विट करून प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले आनंद महिंद्रा?

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी थोटा श्रीकांत यांची पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला. आनंद महिंद्रा यांनी, मुली तुने माझा दिवस छान केला (please tell your daughter she just made my day) असे म्हणत एक आनंद दर्शवणारी इमोजी शेअर केली आहे. आनंद महिंद्रा यांच्या या कृतीचे नेटकऱ्यांनी जोरदार स्वागत केले आहे.

(Viral video : हा आहे खराखुरा स्पायडरमॅन, वयाच्या साठीत ४८ मजली इमारतीवर केली चढाई, जगाला दिला हा संदेश)

काय म्हणाले नेटकरी?

आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. एकाने श्रीकांत यांच्याप्रमाणे महिंद्राचे वाहन घेतानाचा एक व्हिडिओ टाकला आहे. आपल्या मुलाचे ते स्वप्न होते असे त्यांनी लिहिले आहे. सध्या महिंद्राची एक्सयूव्ही ७०० बाजारात धुमाकूळ घालत आहे. कारमधील सनरूफ आणि ADAS तंत्रज्ञान ग्राहकांना आवडत आहे.

Story img Loader