Anand Mahindra tweet मुंबईची ओळख असणारी जुनी डबल डेकर बस सेवेतून निवृत्त झाली. १५ सप्टेंबरपासून डबल डेकर बस बंद करण्यात आल्या, यावेळी अनेक मुंबईकर या बसला निरोप देण्यासाठी उपस्थित होते. आयुर्मान संपल्याने या बस कालबाह्य करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. त्यानंतर फक्त एसी डबलडेकर बसच प्रवाशांच्या सेवेत असतील. दरम्यान आनंद महिंद्रा यांनीही बेस्ट बसच्या निरोपाचा एक फोटो शेअर करत मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. आनंद महिंद्राच्या या ट्विटनंतर मुंबई पोलिसांनीही मन भावूक करणारा रिप्लाय दिला आहे.
मुंबई पोलिसांना टॅग करत त्यांनी म्हटलं आहे की, हॅलो मुंबई पोलिस, मी माझ्या बालपणीच्या सगळ्यात प्रिय आणि महत्त्वाच्या आठवणीतील एक आठवण चोरी झाल्याची तक्रार करु इच्छितो. यावर मुंबई पोलिसांनीही त्यांना उत्तर दिलं आहे. मुंबई पोलिसांनीही महिंद्रा यांच्या ट्विटवर रिप्लाय केला आहे. आम्हाला आनंद महिंद्रा सरांकडून एक नॉस्टॅल्जिक चोरीची तक्रार मिळाली आहे. आम्ही चोरी झाल्याचे स्पष्टपणे पाहू शकतोय. मात्र आम्ही ती ताब्यात घेऊ शकत नाही. त्या सुंदर आठवणी तुमच्या व सगळ्या मुंबईकरांच्या दृदयात सुरक्षितरित्या कैद करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांचा रिप्लाय वाचून आनंद महिंद्राही थक्क झाले आहेत. त्यांनीही त्यावर रिप्लाय करत तुम्ही खूपच ग्रेट आहात, असं म्हटलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी केली तक्रार
हेही वाचा >> VIDEO: ‘प्रेमाची लागली भन्नाट’ आजोबांनी शेतातच धरला ठेका, पाहून आज्जीही झाल्या लाजून लाल
पोलिसांनी दिलं उत्तर
आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर अनेकांनी रिप्लाय केले आहे. काही युजर्सने डबल-डेकर बससंबधीत त्यांच्या आठवणीदेखील महिंद्रांसोबत शेअर केला आहे.
मुंबईत १९३७ मध्ये डबल डेकर बसची सुरुवात झाली, ८६ वर्ष या बसने प्रवाशांना सुखकर प्रवासाचा आनंद दिला. सध्या बेस्टच्या ताफ्यात केवळ ३ डबल डेकर ओपन डेक बस आणि ७ साध्या डबल डेकर बस उरल्या होत्या. साध्या डबल डेकर बस १५ सप्टेंबरपासून सेवेतून निवृत्त झाल्या आहेत, तर मुंबई दर्शन घडवणाऱ्या ओपन डेक डबल डेकर बस 5 ऑक्टोबरनंतर सेवेतून पूर्णत: बंद होणार आहेत. मुंबईकरांच्या व्यस्त जीवनशैलीत पण गरजेच्या वेळी दिलेली ८६ वर्षांची अविरत साथ आता सुटली आहे.