चालू वर्ष संपत आलं की सगळ्यांनाच वेध लागतात ते नव्या वर्षाच्या स्वागताचे. पण नवीन वर्षाच्या आगमनासोबतच येणाऱ्या वर्षासाठीचे संकल्प देखील चर्चेत असतात. नव्या वर्षात काय घडायला हवं? या प्रश्नावर प्रत्येकाची वेगवेगळी उत्तरं असतात. पण आपल्या हटके ट्वीट्समुळे कायमच चर्चेत असणारे महिंद्रा समूहाचे संचालक आनंद महिंद्रा यांनी आपल्या नववर्षाच्या शुभेच्छा आणि नव्या वर्षाकडून असलेल्या अपेक्षा देखील तितक्याच हटके पद्धतीने व्यक्त केल्या आहेत. यासाठी त्यांनी नेहमीप्रमाणे एक ट्वीट केलं असून त्यासोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय आहे या व्हिडीओमध्ये?

आनंद महिंद्रा यांनी शुक्रवारी दुपारी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटसोबत एक व्हिडीओ असून त्यामध्ये उंच डोंगराळ भागातच आढळणाऱ्या अँडियन कंडोरनं अवकाशात घेतलेली झेप दिसत आहे. काही व्यक्ती या पक्ष्याला एका बंद खोक्यातून बाहेर सोडताना दिसत आहेत. खोक्यातून बाहेर येताच हा अँडियन कंडोर एका दगडावर पवित्रा घेऊन क्षणार्धात आपले मोठाले पंख पसरवत अवकाशात झेपावल्याचं दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी ग्लोबल कॉमन्स अलायन्सचा लोगो देखील दिसत आहे.

आनंद महिंद्रा यांना नेमकं काय म्हणायचंय?

आनंद महिंद्रा यांच्या या ट्वीटला काही तासांतच रिट्वीट आणि लाईक्स मिळू लागले आहेत. नेटिझन्स देखील या ट्वीटला रिप्लाय करू लागले आहेत. आपल्या ट्वीटमध्ये आनंद महिंद्रा यांनी २०२० सालाकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत, याविषयीचा संदेश लिहिला आहे.

अँडियन कंडोरची गोष्ट!

“फक्त एका व्हिडीओनं नव्या वर्षाकडून माझ्या असलेल्या सर्व आशा व्यक्त केल्या आहेत. सिंची हा एक अँडियन कंडोर पक्षी आहे. गंभीर विषबाधा झाल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. पण तो बरा झाल्यानंतर त्याला पेरू देशाच्या पर्वतरांगांमध्ये सोडून देण्यात आलं आहे. कोविडनंही जगाला अशीच विषबाधा केली आहे. आपल्याला २०२२ मध्ये (या पक्ष्याप्रमाणेच) सामुहिक पंख मिळावेत अशी आशा आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा”, असं आनंद महिंद्रांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

याआधी गुरुवारी त्यांनी केलेल्या एका ट्वीटची देखील जोरदार चर्चा झाली. यामध्ये एक वाघ आख्खी गाडी आपल्या दातांच्या जोरावर ओढून नेत असल्याचं दिसत आहे. त्यावरून “वाघालाही सांगायचं असावं की महिंद्रा कार या फार चविष्ट असतात”, असा संदेश एका व्हिडीओसोब त्यांनी पोस्ट केला होता.

या व्हिडीओला देखील हजारो रीट्वीट्स आणि लाईक्स मिळाले आहेत.