महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टीव्ह असतात. कधी कोणाला मदतीचा हात देऊन तर कधी एखाद्या अगदी सामान्य गोष्टीवर ते ट्विटद्वारे व्यक्त होताना दिसतात. त्यांच्या या ट्विटसची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चाही होताना दिसते. आज दसऱ्याच्या निमित्ताने महिंद्रा यांनी असेच एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी एक व्यंगचित्र ट्विट केले आहे. एका हॉटेलबाहेर प्रत्येकी ५०० रुपये असा बोर्ड लावला आहे आणि त्यासमोर १० तोंडांच्या रावणाचे चित्र असून तो ‘हे योग्य नाही’ असे तो म्हणत असल्याचे चित्रात दाखवले आहे. या चित्रावर महिंद्रा म्हणतात, आज नक्कीच याचा दिवस नाही. यापुढे त्यांनी एक हसणारे स्मायलीही टाकले आहे.

दसऱ्याला रामाने रावणाचे दहन केले. याचा अर्थ वाईट शक्तींचा नाश करण्याचा दिवस. त्यामुळे रावणाचे आज विशेष महत्त्व असल्याने महिंद्रा यांनी हे ट्विट केले आहे. अवघ्या तासाभरात या ट्विटला दिड हजारच्या आसपास लाईक्स मिळाले आहेत. तर २०० हून अधिक जणांनी ते रिट्विट केले. अनेकांनी यावर बरोबर बोलताय किंवा आणखीही काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. याट्विटआधी त्यांनी एका ट्विटव्दारे दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. आयुष्यात अनेक नकारात्मक गोष्टी असताना दसऱ्यामुळे एकप्रकारची सकारात्मकता येते. त्यामुळे मला दसरा आवडतो. वाईट गोष्टींवर चांगल्याचा विजय असे या दिवसाचे महत्त्व आहे.