Anand Mahindra Tweet: महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. खासकरुन ते ट्विटरचा वापर करत असतात. या सोशल मीडिया साइटवर ते नियमितपणे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेल्या गोष्टी या लवकर व्हायरल होतात. फोटो, व्हिडीओ यांच्यापेक्षा त्यांना आनंद महिंद्रा यांनी दिलेल्या कॅप्शन्सची चर्चा लोकांमध्ये असते. नुकताच त्यांनी एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांच्या चाहत्यांनी या फोटोखाली कमेंट्स केल्या आहेत.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये महिंद्रा कंपनीच्या गाड्यांना जसा बोनेट असतो, त्याच्या सारखा बोनेट पाहायला मिळतो. त्यावर मोठा फ्लॅट टिव्ही ठेवल्याचेही दिसते. महिंद्रा थार गाडीचे अनुकरण करत हे डिझाइन बनवण्यात आले असावे असा अंदाज लावला जात आहे. या खास डिझाइनचा वापर टिव्ही स्टॅन्ड म्हणून करत असल्याचे फोटो पाहिल्यावर दिसते. विशेष म्हणजे हा टिव्ही स्टॅन्ड तयार करताना गाडीच्या पुढच्या भागामध्ये असलेल्या गोष्टी म्हणजेच समोरील हेडलॅम्प, नंबर प्लेट आणि पुढची दोन चाकंही जोडली गेली आहेत.
“धन्यवाद.. आम्ही खुश झालो आहोत. (आणि हा मी पाहिलेला सर्वात मोठा डॅशबोर्ड’ स्क्रीन डिस्प्ले आहे..)”असे कॅप्शन देत आनंद महिंद्रा यांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला ७.५ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. तसेच १९,००० पेक्षा जास्त ट्विटर यूजर्सनी हा फोटो लाइक केला आहे. अनेकांनी हा फोटो शेअर देखील केला आहे. फोटोला असंख्य कमेंट्सदेखील आल्या आहेत.