प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा समाजमाध्यमांवर बरेच सक्रीय असतात. विविध विषयांवरील त्यांच्या पोस्ट बऱ्याच व्हायरल होत असतात. महिंद्रा यांनी नुकतीच त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. दिल्लीतील फुटपाथवरून जाताना अचानक पायाखालची जमीन ढासळल्याचा एका व्यक्तीचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आहे. ‘ब्रह्मांड या व्यक्तीला नेमका कोणता संदेश पाठवत आहे याबाबत विचार करण्यात मी हा विकेंड घालवणार आहे. तो व्यक्ती तुम्ही असाल तर नेमका काय विचार केला असता’, असा मजेशीर सवाल त्यांनी या पोस्टद्वारे केला आहे.

रस्त्यावरील भारताच्या आकाराचा खड्डा पाहून आनंद महिंद्रांनाही बसला धक्का; फोटो पोस्ट करत म्हणाले…

रस्त्याच्या पलीकडील दुकानात जात असताना एका व्यक्तीला हा अनुभव आला. फुटपाथ पार केल्यानंतर पुढचे पाऊल टाकताच जमीन ढासळल्याचा हा व्हिडिओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे. या घटनेनंतर तो व्यक्ती काही काळ स्तब्ध उभा राहतो. अपघातातून थोडक्यात वाचल्याचे भाव या व्हिडिओमध्ये या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटताना स्पष्ट दिसतात. एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ३० सेकंदांचा हा व्हिडिओ कैद झाला आहे.

‘भाजपा खासदारांनी त्यांच्या पत्नींना…’; बद्रुद्दीन अजमल यांचा मोदी सरकारवर निशाणा

महिद्रांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘एक सेकंदही उशीर करू नका’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘किंवा काही मिनिटे उशीर करा…अशाप्रकारेही तुम्ही वाचू शकता’ अशी खोचक कमेंटही एका नेटकऱ्याने केली आहे. पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी नागरिकांनी सरकारवर दबाव आणला पाहिजे, अशी प्रतिक्रिया एका युजरने या व्हिडिओवर दिली आहे. ‘जर या घटनेत या व्यक्तीला काही झाले असते तर सरकारने काय केले असते? काही लाखांची भरपाई दिली असती का?’ असा गंभीर सवाल करत दुसऱ्या एका युजरने महानगरपालिकेला टॅग केले आहे.

Story img Loader