Anand Mahindra Monday Motivation Video: रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आपल्याला ठिकठिकाणी वाहतूक पोलिस उभे असल्याचे दिसते. ऊन, वारा, पाऊस कोणत्याही ऋतूमध्ये त्यांना रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रित करावीच लागते. अनेकांना वाहतूक पोलिसांचे काम कंटाळवाणे आणि तितकेच आव्हानात्मक वाटू शकते. पण, इंदूरमध्ये एक असा वाहतूक पोलिस आहे जो आपले काम खूप एनर्जी आणि जोशाने करत असतो. जगभरातील लोक या पोलिसाला डान्सिंग कॉप म्हणून ओळखतात. हा वाहतूक पोलिस कधी नाचून, तर कधी हटके हावभाव करत रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करत असतो. आता त्याची ही स्टाईल भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही भावली आहे. आनंद महिंद्रा यांनी या हटके वाहतूक पोलिसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्याला त्यांनी मंडे मोटिव्हेशन असे म्हटले आहे.(Anand Mahindra Monday Motivation dancing cop video)

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसले?

रस्त्यावरून जाताना तुम्हाला अनेक रस्त्यांवर वाहतूक पोलिस उभे असलेले पाहायला मिळतात. पण, हे पोलिस शांतपणे उभे राहून त्यांच्या पद्धतीने वाहतूक कोंडी सोडवत असतात. पण, सध्या एका ट्रॅफिक पोलिसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो तुम्हालाही खूप आवडेल. यात एक ट्रॅफिक पोलिस अतिशय अनोख्या पद्धतीने आणि डान्स करत ट्रॅफिक कंट्रोल करतोय.

Read More Trending News : “तु मेरा हुकूम का इक्का…” विद्यार्थ्यांनी बडवली ढोलकी अन् मास्तरांनी धरला जबरदस्त ठेका, Video तुफान व्हायरल

आनंद महिंद्रा यांना वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याची काम करण्याची ही पद्धत इतकी आवडली की, त्यांनी त्याचा एक व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे, ज्यावर त्यांनी मंडे मोटिव्हेशन म्हटले आहे. महिंद्रांनी त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, या पोलिसाने हे सिद्ध केले की, कोणतेही काम कंटाळवाणे नसते; तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता. आनंद महिंद्रांची ही पोस्ट आता युजर्सनाही पसंतीस पडत आहे. (Anand Mahindra Monday video)

युजर्सच्या वेगवेगळ्या कमेंट्स (Anand Mahindra share video)

व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले आहे की, काम तुम्हाला आनंदी आणि यशस्वी बनवते. दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, तुम्हाला तुमच्या कामाची प्रचंड आवड आहे. तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, त्यांच्या कामाचा आनंद घेणारे लोक पाहून आनंद झाला. शेवटी एका युजरने लिहिले आहे की, “वास्तविक जीवनातील उदाहरण.”

Story img Loader