Who Is Anand Mahindra’s Wife: आनंद महिंद्रा हे जगप्रसिद्ध उद्योगपती आहेत. वर्षानुवर्षे महिंद्राच्या गाड्यांची बदलती आवृत्ती, त्यांचा ग्राहक वर्ग व आनंद महिंद्रा यांचे चाहते या तिन्हींचा आलेख चढता राहिला आहे. सोशल मीडियावरही आनंद महिंद्रा अत्यंत प्रसिद्ध आहेत. आपल्या मजेशीर ट्वीटने व वेगवेगळ्या विषयांवरील प्रामाणिक प्रतिक्रियांमुळे त्यांचा ऑनलाईन फॅन ग्रुप सुद्धा खूप वाढला आहे. आनंद महिंद्रा पर्यावरण, खेळ, ऑटो, टेक सर्वच क्षेत्रात काही वेगळे करून पाहणाऱ्यांना पाठिंबा देत असतात पण महिंद्रांना सदैव पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या पत्नीविषयी तुम्हाला ठाऊक आहे का. मिसेस महिंद्रा म्हणजेच अनुराधा महिंद्रा या एक प्रसिद्ध उद्योजिका आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आनंद महिंद्रा यांच्या पत्नीविषयी खास गोष्टी..

अनुराधा महिंद्रा या लग्जरी लाइफस्टाइल मॅगझीन Verve च्या संस्थापक व मॅन्स वर्ल्ड मॅगझीनच्या सह- संस्थापक आहेत. अनुराधा यांचा जन्म व शिक्षण मुंबईतच झाले होते. मुंबईतील सोफिया कॉलेजमध्ये त्यांनी सायकोलॉजीच्या पदवीचे शिक्षण घेतले याच वेळी त्यांची आनंद महिंद्रा यांच्याशी भेट झाली. आनंद हे तेव्हा इंदौरमध्ये आपल्या पदवीसाठी एक प्रोजेक्ट फिल्म बनवत होते. यावेळी अनुराधा केवळ १७ वर्षाच्या होत्या.

आनंद महिंद्रा यांनी असं केलं होतं प्रपोज

आनंद महिंद्रा यांनी अत्यंत रोमँटिक अंदाजात अनुराधा यांना प्रपोज केलं होतं. त्यांनी आपल्या आजीची अंगठी देऊन अनुराधा यांना लग्नाची मागणी घातली होती, अजूनही ती अंगठी सर्वात मौल्यवान दागिन्यांप्रमाणे अनुराधा यांनी सांभाळून ठेवली असल्याचे त्या सांगतात. आनंद यांनी आपल्या शिक्षणातून एका सेमिस्टरची सुट्टी घेऊन अनुराधा यांच्याशी लग्नगाठ बांधली व मग हे जोडपं अमेरिकेला निघून गेलं. अनुराधा यांनी अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटी मधून कम्युनिकेशनमध्ये मास्टर पदवी प्राप्त केली आहे.

काही वर्ष अनुराधा यांनी पत्रकार व संपादक म्हणून सुद्धा काम पाहिले होते. रोलिंग स्टोन्स इंडिया या प्रकाशनाच्या प्रमुख संपादकाची भूमिका सुद्धा अनुराधा यांनी बजावली आहे. अनुराधा यांना वाचनाची आवड आहे. हारुकी मुराकामी, गेब्रियल गार्सिया मार्केज व वीएस नायपॉल हे त्यांचे आवडते लेखक असल्याचे त्या सांगतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra wife is famous business women anuradha mahindra photos love story check unseen side of celebrities svs