Merry Christmas: जगभरात आज ख्रिसमस डे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने अनेक पालक आपल्या मुलांना भेटवस्तू देतात. त्यांचे सांताक्लॉजचे कपडे घालून छान छान फोटो काढतात. या दिवशी अनेक शाळांमध्येही लहान मुलांना स्पेशल सांताक्लॉजच्या वेशभूषा करून येण्यास सांगितले जाते. दरम्यान, देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अशाच सांताक्लॉजच्या वेशभूषेतील चिमुकल्यांचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे, जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर आपसूकच हसू उमटेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्योगपती आनंद महिंद्रा अनेकदा त्यांच्या एक्स अकाउंटवर काहीवेळा हृदयस्पर्शी, तर अनेकदा मजेशीर फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असतात. ख्रिसमसच्या निमित्तानेही त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक पंजाबी माणूस अनेक चिमुकल्यांना सायकल रिक्षात बसवून घेऊन जात असल्याचे दिसतेय. यात सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे या सर्व चिमुकल्यांनी सांताक्लॉजचे कपडे घातले आहेत.

चिमुकल्या सांताक्लॉजच्या फोटोने जिंकले महिंद्रांचे मन

आनंद महिंद्रा यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर चिमुकल्या सांताक्लॉलचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक सरदारजी सांताक्लॉजच्या वेशात असलेल्या अनेक चिमुकल्यांना एकाचवेळी सायकल रिक्षातून घेऊन जात असल्याचे दिसत आहे.

त्यांनी हा सुंदर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “ख्रिसमसच्या दिवशी या क्लासिक फोटोने माझ्या चेहऱ्यावर हसू आणण्यात अपयशी ठरला नाही. ख्रिसमस डेनिमित्ताने माझ्या कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा. या फोटोचा फोटोग्राफर कोण आहे हे माहीत नाही; हो, पण मला त्याला श्रेय द्यायला जास्त आनंद होईल.” आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला फोटो पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मुलांसाठी ही एक मजेदार राइड; युजर्सच्या कमेंट्स

व्हायरल झालेल्या या फोटोला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा. देव तुम्हा सर्वांना खूप प्रेम, आनंद आणि चांगले आरोग्य देवो.” दुसर्‍या युजरने लिहिले, “छान, मुलांसाठी ही एक मजेदार राइड आहे, सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा.” तिसऱ्या युजरने लिहिले की, “जीवनाचा उत्सव हा धर्म आणि राष्ट्राच्या सीमांच्या पलीकडे आहे. भारतात शतकानुशतके आम्ही याचा प्रचार करत आहोत – ‘सर्व धर्म सम भाव.’ दरम्यान, हा फोटो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो अनेकांना फार आवडतही आहे.

Merry Christmas 2023: ‘या’ ७ देशांमध्ये ख्रिसमस साजरा करण्याच्या आहेत वेगळ्या अन् अनोख्या परंपरा

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून अनेकदा लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करतात. ते आपल्या पोस्ट्सच्या माध्यमातून लोकांना नवीन माहिती देत ​​असतात. यात आता ख्रिसमसनिमित्त त्यांनी शेअर केलेली ही पोस्टही अनेकांना फार आवडली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra wishes merry christmas to all with this viral video clip littles santa claus on rickshaw watch sjr