आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावरील सर्वात ‘सक्रिय’ उद्योगपतींपैकी एक म्हणून ओळखले जातात. ते अनेकदा ट्विटरवर मजेदार मीम्स आणि व्हिडिओ शेअर करतात. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर त्यांनी शेअर केलेल्या अलिकडच्या व्हिडिओमध्ये, त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील एका कॅफेवर कमेंट केली आहे ज्यांनी Husband day care centre म्हणून पाटी लावत अत्यंत हुशारीने जाहिरात केली आहे.
कॅफे बाहेरील पाटी चर्चेत
२५ जानेवारी रोजी आनंद महिंद्रा यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यमध्ये एका कॅफे/बारच्या बाहेर लावण्यात आलेल्या पाटीवर ‘Husband day care centre ‘ म्हणून जाहिरात केली आहे. या पाटीवर लिहिले आहे की, येथे थंड बिअर, रग्बीची सोय आहे. तसेच विवाहित महिलांना उद्देशुन म्हटले की,” तुम्हाला स्वत:साठी वेळ हवा आहे, शॉपिंग करायला जायचे का? मग तुमच्या नवऱ्यांना आमच्याकडे सोडून जा”
‘Husband day care centre पाहून नेटकरी चकीत
कॅफेने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट कल्पना वापरली आहे. दिवस रात्र नवऱ्याच्या मागे पुढे करणाऱ्या बायकांना स्वत:साठी वेळ मिळावा म्हणून आपल्या नवऱ्यांना आमच्याकडे सोडून जा म्हणत त्यांनी हटके सुविधा दिली आहे. ही कल्पना महिलांबरोबर अनेक नवऱ्यांना आवडली आहे ज्यांना बायकोबरोबर शॉपिंगसाठी फिरण्याचा कंटाळा येतो. सहसा लहान बाळाला सांभाळण्यासाठी ही सुविधा दिली जाते पण प्रत्येक कामासाठी बायकोवर अवलंबून असलेल्या नवऱ्याला सांभाळण्याची सुविधा कोणी देत असेल तर त्यांच्या बायकांसाठी या पेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही. कॅफेच्या ही हटके सुविधा पाहून नेटकऱ्यांबरोबर आनंद महिंद्राही चकित झाले आहे. पण जाहिरातीमध्ये दिसणाऱ्या स्कॉर्पिओ कारला पाहून ते जास्त थक्क झाले आहे.
आनंद महिंद्रानी केले ट्विट
आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये असे लिहिले होते, “दक्षिण आफ्रिका. मला फक्त आश्चर्य वाटते की, स्कॉर्पिओमधील माणूस स्वतः गाडीने डे केअरला गेला असेल की “त्याच्या बायकोने त्याला तिथे गाडीने आणून सोडले असेल!” त्यांनी विनोदी पद्धतीने नमूद केले की,”महिंद्रा स्कॉर्पिओमधील माणूस आराम करण्यासाठी डेकेअर सेंटरला कसा गाडीने गेला असावा.” नेटकऱ्यांना त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.. काहींनी व्हिडिओमधील जाहिरातीच्या उत्तम कल्पनेवर हसले तर काहींनी त्याच्या विनोदाची प्रशंसा केली.
नेटकरी म्हणाले
एका एक्स वापरकर्त्याने व्हिडिओच्या संदर्भाचे समर्थन करत म्हटले आहे की, “मला ही कल्पना खूप आवडली. कदाचित स्पोर्ट्स बारला एका बारमध्ये बदलण्याची ही एक उत्तम कल्पना आहे.बायको जे काही करायचे ते केल्यानंतर नवऱ्याला घेऊन जाऊ शकते”.
दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे की, “अशा प्रकारचे मीम्स शेअर करू नका सर जी. विसरू नका की तुम्ही देखील विवाहित आहात.” या व्हायरल व्हिडिओखाली येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये सहभागी होण्यापासून नेटिझन्स थांबू शकले नाहीत.
दुसर्या एक्स वापरकर्त्याने विनोदीपणे म्हटले आहे की, “काहीही झाले तरी महिंद्रा मशीन्स सर्वत्र असतील.”