World Jump Rope Championship: लहानपणी तुम्ही दोरीच्या उड्या मारल्या असतील. कधी लहान मुलांना दोरीच्या उड्या मारताना पाहिले असेल. दोरीच्या उड्या मारणे स्वत:ला फिट करण्याची पद्धत झाली आहे. आता पर्यंत दोरीच्या उड्या मारल्या असतील किंवा इतरांना दोरीच्या उड्या मारताना पाहिले असेल. बिझनेस टायकून आनंद महिंदा यांनी दोरीच्या उड्या मारतानाचा जो व्हिडीओ शेअर केला आहे जो लोकांना प्रेरणा देत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्ही एक क्षण सुद्धा तुमची नजर हटूव शकणार नाही. हा व्हिडीओ पाहून तुमच्या लहानपणीच्या आठवणी नक्कीच जाग्या झाल्या होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंद महिंद्रा नेहमी चर्चेमध्ये असतात. ट्विटरवर ते अॅक्टिव्ह असतात. त्याना आवडलेल्या गोष्टी ते ट्विटरवर दर सोमवारी, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष त्यांच्या सर्व अनुयायांना प्रेरित करण्यासाठी एक प्रेरक पोस्ट शेअर करतात. या आठवड्यात, बिझनेस टायकूनने थेट वर्ल्ड जंप रोप चॅम्पियनशिपचा व्हिडिओ शेअर केला. व्हिडीओ शेअर करतना महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की , ‘फोकस, अलर्ट्नेस, अॅबिलिटी, कोलॅबरेशन…एक चांगल्या आठवड्याची सुरुवात करण्यासाठी एक चांगले टुल किट आहे.

हेही वाचा – पोलिसांनी घडवून आणली मायलेकरांची भेट, पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुत्रींच्या पिल्लांना वाचवले, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ

महिंद्रा यांनी दोरीच्या उड्या मारताना स्पर्धकांच्या टीम वर्कचे कौतूक केले आहे. व्हिडिओमध्ये टॅलेंट, बॅलन्स आणि टीमवर्क याचे उत्कृष्ट कॉन्बिनेशन पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ वर्ल्ड जंप रोप स्पर्धेतील आहे. दोरीच्या उड्या मारण्याचे हे कौशल्य पाहून सर्वजण चकित झाले आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टीममध्ये दोन लोक तुमच्या दोन व्यक्ती हातात दोरी पकडून ती एकासारख्या वेगात संतुलन ठेवत फिरवत आहे आणि मध्ये एक व्यक्ती या दोरीवर उड्या मारतो आहे. त्याच्या पायांकडे पाहिल्यानंतर असे वाटते की तो डान्स करत आहे. हा व्हिडीओ पाहून हे फार सोपे वाटत असले तरी ते तितकेच अवघड आहे.

नेटफ्लिक्स देणार नोकरीची संधी! ‘या’ कामासाठी मिळेल साडे सात कोटी रुपये वार्षिक पगार!

नेटकऱ्यांनी केले कौतूक

हा व्हिडीओ आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून त्याला सातत्याने पसंती मिळत आहे. ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ मंडे मोटिव्हेशन आहे, कारण आठवड्याच्या पहिल्या दिवशी लोकांवर ऑफिसमध्ये जाण्याचे आणि जास्त काम करण्याचे दडपण असते, अशा परिस्थितीत आनंद महिंद्राचा हा प्रेरणादायी आणि प्रेरक व्हिडिओ लोकांना प्रेरणा देत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एकाने लिहिले की, ते खूप प्रेरणादायी आहे. आणखी एका युजरने लिहिले की, त्यांची ऊर्जा खरोखरच कौतुकास्पद आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindras monday motivation video is straight from world jump rope championship snk
Show comments