Anant Ambani and Radhika Merchant wedding : Anant Ambani and Radhika Merchant wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतेय. अनंत अंबानी आणि राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये पार पडला. विशेष म्हणजे हा प्री-वेडिंग सोहळा तब्बल तीन दिवस सुरू होता. आता अनंत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नाबद्दल मोठे अपडेट येत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा मार्चमध्ये प्री-वेडिंग सोहळा झाल्यानंतर सर्वांना त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा होती. अखेर त्यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण ठरलं आहे. त्यांची लग्नपत्रिका समोर आली आहे. अनंत आणि राधिका यांचं लग्न मुंबईतच होणार आहे. त्यांच्या लग्नाची तारीख आहे १२ जुलै. बीकेसीमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान, या जिओ वर्ल्ड सेंटरच्या लिफ्टचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातील लिफ्ट जगातील सर्वात मोठी लिफ्ट असल्याचे म्हटले जात आहे. या लिफ्टचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी ती तब्बल २०० जणांना वाहून नेऊ शकते. तुम्हीही हा व्हिडीओ आणि ही भव्यदिव्य लिफ्ट पाहून अवाक् व्हाल.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो

देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा लग्नसोहळा १२ जुलै २०२४ रोजी मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडणार आहे. पारंपरिक हिंदू रितीरिवाजानुसार त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. १२ ते १४ जुलैदरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडेल. जिओ वर्ल्ड सेंटरची ही लिफ्ट जगातील सर्वात मोठी लिफ्ट म्हटली जाते. या लिफ्टमध्ये एकाच वेळी २०० जण सामावू शकतात. त्यामुळे ही लिफ्ट पाहायला येणाऱ्यांची संख्यादेखील मोठी असते. या आलिशान लिफ्टचा व्हिडीओ एक्स हॅण्डल @gunsnrosesgirl3 या अकाउंटने शेअर केला आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, ही भव्य दिव्य लिफ्ट एखाद्या घरापेक्षा कमी नाहीये. त्याचं इंटेरिअर डिझाईनही एकदम खास केलेलं आहे. ही लिफ्ट प्रत्येकाचेच डोळे चमकतील अशी आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं नजर टाकताच हरणानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओला भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर देत आहेत.

Story img Loader