Anant Ambani Called Begger: शाळा- कॉलेज ते अगदी आता ऑफिसमध्येही कुणी गरजेपेक्षा जास्त खर्च करत असेल किंवा अगदीच दिलदार होत असेल तर त्याला वाह्ह भावा तू काय अंबानींचा मुलगा आहेस का असं सहज विचारलं जातं. तुम्ही सुद्धा कोणी पार्टी वैगरे मागितली तर हेच वाक्य कधी ना कधी वापरलं असेल. पण तुम्हाला माहितेय का एकदा चक्क अंबानींच्या लाडक्या लेकालाच लोकांनी तू अंबानीचा मुलगा आहेस की भिकारीचा असा प्रश्न केला होता. यावरून अनंत अंबानी चक्क आईकडे म्हणजेच नीता अंबानींकडे तक्रार सुद्धा घेऊन आला होता. हा किस्सा अलीकडे नीता अंबानी यांनी एका कार्यक्रमात सांगितला.
इशा अंबानी सांगते, “आई म्हणजे वाघीण… “
Vogue मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ईशा अंबानीने आईने लावलेल्या शिस्तीविषयी भाष्य केलं होतं, “आम्ही पाच वर्षाचे असल्यापासून स्वतःची कामे स्वतः करतो. आई अजूनही एखाद्या वाघिणीसारखी आहे. जेव्हा आईचं आणि माझं भांडण व्हायचं तेव्हा आम्ही बाबांना फोन करायचो, आई कडक शिस्तीची असल्याने आम्हाला शाळेला एकही दिवस सुट्टी घेता यायची नाही. आम्ही वेळेवर जेवण करतो, खेळतो आणि तेवढाच अभ्यासही करतो का हे आई नेहमी पाहायची.”
जेव्हा अनंत अंबानीला मित्र भिकारी म्हणाले…
नीता अंबानी यांनी iDiva ला सांगितले की, जेव्हा त्यांची मुलं लहान होती तेव्हा ती त्यांना शाळेच्या कॅन्टीनमध्ये खाऊ खाण्यासाठी त्या त्यांना दर शुक्रवारी 5 रुपये द्यायच्या. एके दिवशी त्यांचा धाकटा मुलगा अनंत त्यांच्या खोलीत आला आणि ५ रुपयांऐवजी १० रुपये मागितले. नीता यांनी यावर का असे विचारले असता अनंत अंबानीने सांगितले की, “शाळेतील सर्व मुले मला हसतात. जेव्हा मी खिशातून पाच रुपये काढतो तेव्हा ‘तू अंबानी आहेस की भिकारी आहेस?’ असं विचारतात. नीता यांनी सांगितले की, या गोष्टीवरून त्या स्वतः आणि मुकेश अंबानी सुद्धा हसले होते. त्या सांगतात, लहानपणापासून मुलांना डाऊन टू अर्थ ठेवण्यासाठी त्या कॉलेजला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक वापरायला लावत असे.
हे ही वाचा<< अनंत अंबानीच्या फिटनेस ट्रेनरचे मानधन ऐकून व्हाल थक्क! १०८ किलो वजन कमी करताना दिला होता ‘असा’ डाएट
जेव्हा अनंत अंबानीने डाएटिंग सुरु केलं…
एवढंच नाही तर नीता यांनी अनंतला वजन कमी करण्यास प्रेरणा मिळावी म्हणून स्वतः सुद्धा डाएट केले होते. २०१७ मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नीता अंबानी म्हणाल्या होत्या की, ‘मुले ते करतात जे त्यांची आई करते आणि मी स्वतः जेवते आणि माझा मुलगा डायटिंग करतो, मी हे पाहू शकत नाही. त्यामुळे मीही अनंतसह डायटिंग करायला सुरुवात केली आणि आम्हा दोघांचे वजन कमी झाले.”