Anant Ambani Richard Mille Watch : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि एमडी मुकेश अंबानी हे केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.मुकेश अंबानी हे अब्जाधीश आहे. एका दिवसात ते कोट्यवधी रुपये कमवतात. अलिकडेच, राधिका मर्चंटसोबतच्या एका आउटिंग दरम्यान मुकेश अंबनी यांच्या घडाळ्यानं लक्ष वेधलं. त्यामुळे महागडी घड्याळे बनवणारी स्विस कंपनी Richard Mille पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनंत अंबानी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात ते या कंपनीचे महागडे घड्याळ RM 52-04 Skull Blue Sapphire हातात घातल्याचे दिसत आहेत. जगातील सर्वात महागड्या घड्याळांमध्ये याचा समावेश आहे. याचे कारण म्हणजे, जगात फक्त अशी तीन घड्याळे आहेत, ज्यापैकी एक अनंत अंबानी यांच्या हातात आहे. या घड्याळाची किंमत $२,६२५,००० म्हणजेच सुमारे २२ कोटी रुपये आहे.
Richard Mille ब्रँडची घड्याळे जगभरात श्रीमंतीचे प्रतीक म्हणून उदयास आली आहेत. ही कंपनी एका वर्षात फक्त ५,३०० घड्याळे बनवते, ज्याची सरासरी किंमत $२५०,००० आहे. राफेल नदालसह जगभरातील अनेक खेळाडू, सेलिब्रिटी आणि उद्योगपती या ब्रँडची घड्याळे घालतात. या कंपनीने आपल्या आगळ्यावेगळ्या डिझाईनसाठी जगात एक वेगळी ओळख मिळवली आहे. हे टायटॅनियम आणि कार्बन फायबर सारख्या पदार्थांपासून बनवले जाते. कंपनीच्या Rm52-05 Manual Winding Tourbillon Pharrell Williams४९.९४ Mm मॉडेलची किंमत तब्बल ३७.७१ कोटी रुपये आहे.
किंमत इतकी जास्त का आहे?
Patek Phillippe, हे घड्याळ उद्योगातील रोल्स रॉयस मानले जाते. याचे कारण म्हणजे, त्यांच्या घड्याळांची किंमत खूप जास्त असते. पण रिचर्ड मिल्सची घड्याळे त्यापेक्षाही महाग आहेत. याबाबत मिल्स म्हणाले होते की, ‘आम्ही पाटेक फिलिप किंवा अन्य कोणत्याही कंपनीशी स्पर्धा करत नाही.’ आज या कंपनीची घड्याळे स्टेटस सिम्बॉल बनली आहेत. हा अब्जाधीशांचा ब्रँड मानला जातो.
बरं, अनंत अंबानी त्यांच्या घड्याळाच्या कलेक्शनसाठी चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनंत अंबानी हे रिचर्ड मिल या स्विस वॉचमेकिंग ब्रँडचा चाहते आणि क्लायंट आहेत, ही कंपनी त्यांच्या खास डिझाईन्स आणि स्काय-रॉकेट किंमत चार्टसाठी ओळखला जाते. अनंत अंबानी यांच्याकडे रिचर्ड मिल RM 56-01 Tourbillon Green Sapphire चे २५ कोटी रुपयांचे घड्याळ आहे. तसेच त्यांच्या घड्याळाच्या कलेक्शनमध्ये अनेक खास आणि किमतीची घड्याळं आहेत.