Anant Ambani- Radhika Merchant Viral Video: रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आपले सहकारी मनोज मोदी यांना तब्बल १५०० कोटींचं घर गिफ्ट म्हणून दिलं होतं. आशियामधील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी, अदाणी, टाटा, बिरला हे एवढे श्रीमंत कसे हा प्रश्न जवळपास प्रत्येकाला पडतो. यासाठी मेहनत करायची सुद्धा अनेकांची तयारी असते, कर्मच काय तर काहीवेळा धनलाभ, श्रीमंती यासाठी अनेक जण नवस बोलतात, देवाला साकडं घालतात आणि ज्योतिषांचे उपाय सुद्धा करून पाहतात. आपल्या इच्छापूर्ण करण्यासाठी अशा अनेक प्रकारच्या श्रद्धा- अंधश्रद्धा पाळणारे लोक तुम्हीही पाहिले असतील, कदाचित तुमच्याही भोळ्या मनाचा यावर विश्वास असेल. पण मंडळी तुम्ही एकटेच नाही बरं का? स्वतः अंबानींच्या लेकाचा सुद्धा यावर विश्वास आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि त्यांची होणारी पत्नी राधिका मर्चंट यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ त्यांचा साखरपुड्याचा आहे, अनंत आणि राधिका एकत्र उभी असतात आणि गप्पा मारत असतात. तेव्हा अनंत यांच्या पापणीचा केस गालावर पडतो. राधिका तो पापणीचा केस अनंतच्या हातावर देते. मग अनंत अंबानी त्यावर फुंकर मारतात. याबाबत आपणही अनेकदा ऐकले असेल की अशाप्रकारे पापणीच्या केसाला फुंकर मारून इच्छा व्यक्त केल्यावर इच्छा पूर्ण होणार असे मानले जाते.

अंबानींच्या श्रीमंतीचे सिक्रेट म्हणत व्हायरल होतोय Video

हे ही वाचा<< भाजपा लोकांना गायीचं शेण देतं आणि अदाणी अंबानींना…वादग्रस्त पोस्टवर अमेरिकन व्यंगचित्रकाराचं स्पष्ट उत्तर

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याला कॅप्शन देताना अनेकांनी आता कुठे अंबानींच्या श्रीमंतीचे गुपित कळले असेही म्हंटले आहे. असाच एक प्रकार मागे एकदा आयपीएलच्या सामन्यात पाहायला मिळाला होता. ज्यामध्ये नीता अंबानी या काहीसा मंत्र म्हणत मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी प्रार्थना करताना पाहायला मिळाल्या होत्या. हा व्हिडीओ मजेशीर पद्धतीने शेअर केला जात आहे यातून कोणताही दावा केलेला नाही.