Anant Ambani-Radhika Merchant Wedding: भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्यांच्या लग्नासाठी १२ जुलै २०२४ रोजी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. अनंत आणि राधिका यांचा बहुप्रतीक्षित विवाहसोहळ्याची अतिशय शुभ सुरुवात व्हावी यासाठी अंबानी कुटुंबीय प्रयत्नशील आहेत. त्यासाठी नीता अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने गुजरातमधील जामनगर येथील एका भव्य मंदिरसंकुलात तब्बल १४ मंदिरे बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही मंदिरे वास्तुकलेचा उत्तम नुमना असणार आहेत. अतिशय नाजूकरीत्या कोरीव काम केलेले स्तंभ, देवी-देवतांच्या मूर्ती, फ्रेस्को शैलीतील चित्रे यांनी ही मंदिरे सुशोभित केली जात आहेत. या मंदिरांतून पिढ्यान् पिढ्या कलात्मक वारशातून प्रेरित वास्तुकला पाहता येईल. त्यामुळे अनंत आणि राधिका यांच्या विवाह सोहळ्याबरोबर आता १४ मदिरांच्या या भव्य संकुलाची चर्चा सुरू झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा