Anant Ambani- Radhika Merchant Wedding Ramdev Baba Dance: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा शाही थाटामाटात पार पडला. १२ जुलैला मुंबईत बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये राधिका व अनंतने लग्नगाठ बांधली. साधारण सहा महिन्यांपासून चालू असणारं सेलिब्रेशन काल लग्नसोहळ्यानंतरही थांबलेलं नाही. उद्या म्हणजेच १४ जुलैला राधिका व अनंतच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडणार आहे. या लग्नसोहळ्यात देशविदेशातील कलाकार, राजकीय नेते, व्यावसायिक यांनी हजेरी लावली. एवढंच नाही तर अनेक अध्यात्मिक गुरु सुद्धा अंबानींच्या घरच्या कार्यात सहभागी झाले होते. अनंत व राधिकाच्या वरातीत काल प्रियांका चोप्रा ते रजनीकांत असे अनेक कलाकार नाचताना दिसून आले. या कलाकारांच्या उत्साही नृत्याची चर्चा होत असतानाच आता ‘अंबानींच्या’ वरातीतला एक भन्नाट व्हिडीओ सुद्धा समोर येत आहे ज्यात चक्क योगगुरू रामदेव बाबा सुद्धा थिरकताना दिसत आहेत.

फिल्मफेअरच्या X खात्यावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा स्वतः अनंत अंबानीचा हात धरून नाचताना दिसतायत. वरातीत अनेक कलाकारांसह अंबानी कुटुंबातील सदस्य सुद्धा आनंद साजरा करताना दिसत आहेत. प्रियांका चोप्राने निक जोनस व ईशा अंबानी पिरामलसह चिकनी चमेली व मुझसे शादी करोगी या गाण्यांवर डान्स केला होता. तर स्वतः मुकेश अंबानी हे रजनीकांत, रणवीर सिंहच्या शेजारी उभे राहून लेकाच्या वरातीत डान्स करत होते.

anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Naga Chaitanya Sobhita Dhulipala Visit Temple
Video : लग्नानंतर नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला निघाले देवदर्शनाला; नागार्जुन होते सोबतीला, व्हिडीओ आला समोर
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “जराही रोमँटिक नाहीस तू…”, तेजूच्या हळदीत तुळजा सूर्यावर रूसणार; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो पाहिलात का?
Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding first photo
नागा चैतन्य दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात! लग्नातील पहिला फोटो आला समोर, सोभिताच्या लूकने वेधलं लक्ष

या सगळ्या व्हिडीओजवर नेटकऱ्यांनी कमेंट करताना “प्रत्येक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींना आपल्या कार्यक्रमात आणून नाचायला भाग पाडण्याची शक्ती फक्त अंबानींमध्येच आहे” अशी एक बाब हायलाईट केली आहे.

राधिका व अनंत अंबानी यांच्या लग्नाचा पहिला फोटो

हे ही वाचा<< Hardik Pandya Ambani Wedding Video : अनंत-राधिकाच्या लग्नात हार्दिक पंड्याने ‘या’ अभिनेत्रीसह दाखवल्या भारी डान्स मूव्ह्ज!

दुसरीकडे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला रिॲलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन, राजकारणी अखिलेश यादव, देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, योगगुरू बाबा रामदेव, क्रिकेटपटू हार्दिक पंड्या, धोनी, जसप्रीत बुमराह उद्योगपती गौतम अदाणी, सॅमसंग चेअरमन ली जे-योंग, बॉलिवूड कलाकारांमध्ये शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ -विकी कौशल, दीपिका पदुकोण – रणवीर सिंह, ऐश्वर्या राय, रेखा, असे असंख्य पाहुणे अंबानींच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. या सर्वच पाहुण्यांचे शेकडो व्हिडीओ सध्या ऑनलाईन प्रचंड व्हायरल होत आहेत.

Story img Loader