Anant Ambani- Radhika Merchant Wedding Ramdev Baba Dance: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा शाही थाटामाटात पार पडला. १२ जुलैला मुंबईत बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये राधिका व अनंतने लग्नगाठ बांधली. साधारण सहा महिन्यांपासून चालू असणारं सेलिब्रेशन काल लग्नसोहळ्यानंतरही थांबलेलं नाही. उद्या म्हणजेच १४ जुलैला राधिका व अनंतच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडणार आहे. या लग्नसोहळ्यात देशविदेशातील कलाकार, राजकीय नेते, व्यावसायिक यांनी हजेरी लावली. एवढंच नाही तर अनेक अध्यात्मिक गुरु सुद्धा अंबानींच्या घरच्या कार्यात सहभागी झाले होते. अनंत व राधिकाच्या वरातीत काल प्रियांका चोप्रा ते रजनीकांत असे अनेक कलाकार नाचताना दिसून आले. या कलाकारांच्या उत्साही नृत्याची चर्चा होत असतानाच आता ‘अंबानींच्या’ वरातीतला एक भन्नाट व्हिडीओ सुद्धा समोर येत आहे ज्यात चक्क योगगुरू रामदेव बाबा सुद्धा थिरकताना दिसत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा