Anant Chaturdashi viral video of Ganapati visarjan dance:७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि काल म्हणजेच १७ सप्टेंबरला आपल्या लाडक्या बाप्पाला सगळ्या भक्तांनी निरोप दिला. ११ दिवस अनेकांच्या घरोघरी, मंडळांमध्ये विराजमान झालेल्या या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकाही अगदी जल्लोषात पार पडल्या. बाप्पाला निरोप देताना नाचत-गाजत मिरवणूक काढत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा एकच जयघोष भाविकांनी केला.

मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल-ताशे, बॅंजो, डीजे यांच्या तालावर अनेक जण अगदी बेभान होऊन नाचले. कोकणातही अगदी वाजत-गाजत बाप्पाची मिरवणूक काढली गेली.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Trending video boy from village singing song of nathicha nakhara goosebumps came on people after listing his song viral video
“नथीचा नखरा नऊवारी साडी” शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला लावलं वेड; सूर असा की अंगावर येतील शहारे, VIDEO पाहाच
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

हेही वाचा… बाप्पाच्या विसर्जनाची अनोखी पद्धत! माणसाने गणरायाच्या मूर्तीसह विहिरीत मारली उडी अन्…, VIDEO पाहून व्हाल अवाक

गणेशोत्सव म्हणजे कोकणकरांचा जिव्हाळ्याचा सण. वर्षभर मुंबईत नोकरी करणारे चाकरमानी सुट्टी काढून आर्वजून गणेशोत्सव काळात कोकणात जातात. बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत आरती, भजन, गौरीदरम्यान अनेक खेळ खेळले जातात तसेच लोककलाही सादर केली जाते. आता कोकणातला विसर्जनाच्या मिरवणुकीतला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओत चक्क डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन एक काका थिरकताना दिसतायत.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओत एक काका डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन थिरकताना दिसतायत. मूर्तीला हात न लावता, काकांनी ती डोक्यावर अगदी उत्तमरीत्या पेलवून घेतली आहे. या काकांच्या मागेदेखील डोक्यावर मूर्ती घेणाऱ्या भाविकांची गर्दी जमली आहे. ‘बाप्पा मोरया रे’ या गाण्यावर बॅंजोच्या तालावर काका ठेका धरताना दिसतायत.

हा व्हिडीओ @konkan_kattaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तर “एकच माझं गाव कोंकण त्याच नाव, निसर्गसौंदर्यानं माखलेलं आमचं कोकण” असंही या कॅप्शनमध्ये पुढे म्हटलं आहे.

हेही वाचा… हद्दच झाली राव! अंगावर पांढरी चादर, नाकात कापूस…, तरुणानं भररस्त्यात केलं मरणाचं नाटक, VIDEO पाहून येईल संताप

असाच आणखी एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता; ज्यात एक आजोबा अशा प्रकारेच डोक्यावर मूर्ती घेऊन थिरकताना दिसले होते.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “आजोबांचं हे नाचणं पुढच्या पिढीत पाहायला मिळणार नाही.” दुसऱ्यानं, “बाप्पासह नाचायला किती आनंद होत असेल ना,” अशी कमेंट केली. अनेकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ अशा स्वरूपाच्या कमेंट्स केल्या आहेत.

Story img Loader