Anant Ambani Childhood Pic: जगातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी असलेले मुकेश अंबानी यांचा धाकटा पुत्र अनंत अंबानी आज १० एप्रिलला आपला ३० वा वाढदिवस साजरा करीत आहे. या प्रसंगी त्याच्या बालपणीच्या नॅनी ललिता डिसिल्वा यांनी सोशल मीडियावर त्याच्यासाठी एक खास संदेश शेअर केला. त्यांनी अनंत अंबानीचा बालपणीचा फोटो शेअर केला आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या शेअर केलेल्या फोटोत अनंत अंबानी लांब केसांसह खूप गोंडस दिसत आहे.
ललिता डी सिल्वा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आणि लिहिले, “माझ्या अनंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव त्याला आशीर्वाद देवो. माझा अनंत आता खूप मोठा झाला आहे. तो ज्या पद्धतीने प्राण्यांवर प्रेम करतो, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.” त्यांनी पुढे लिहिले की, प्राण्यांच्या संरक्षणासाठी केलेल्या कठोर परिश्रमाबद्दल, अनंत… मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझा दिवस आनंदात जावो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
अनंत अंबानीची १७० किमीची पदयात्रा रविवारी ६ एप्रिलला द्वारकाधीश मंदिर येथे पोहोचल्यावर समाप्त झाली. अनंत अंबानीने ३० व्या वाढदिवसानिमित्त भगवान द्वारकाधीशाला नमन केले. यात्रेच्या समारोपावेळी अनंत अंबानीच्या आई नीता अंबानी आणि पत्नी राधिका मर्चंट सहभागी झाले. अनंत अंबानीची धार्मिक पदयात्रा २९ मार्चला जामनगर येथून सुरू झाली होती. गेल्या काही वर्षांत अनंतने बद्रीनाथ, केदारनाथ, कामाख्या, नाथद्वारा, कालीघाट व कुंभ मेळ्यासह भारतातील अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली आहे.
गेल्या वर्षी अनंत आणि राधिका मर्चंटच्या साखरपुड्यादरम्यान ललिता डिसिल्वा यांनी अंबानी कुटुंबाबरोबर घालवलेल्या वेळेबद्दल सांगितले होते. तेव्हा त्यांनी मुकेश आणि नीता अंबानी त्यांच्याशी कसे वागायचे ते सांगितले होते. त्यांनी असेही म्हटले की, अंबानी कुटुंबात कोणताही दिखावा नाही.
अनंतच्या माजी नॅनी ललिता यांनी सोशल मीडियावर लवली गुप्ता यांना लाइव्ह चॅटमध्ये सांगितले की, जेव्हा मी त्या घरात आले तेव्हा माझे मनापासून स्वागत करण्यात आले. इतके मोठे लोक माझे असे स्वागत करतील, असे मला कधीच वाटले नव्हते. त्या म्हणाल्या की, नीतामॅडम आणि मुकेशसर माझ्याशी खूप प्रेमाने वागले. त्यांना आपल्या मुलांचे संगोपन सामान्य पद्धतीने व्हावे, असे वाटत होते.
येथे पाहा फोटो
ललिता यांनी अंबानी कुटुंबातील आकाश, ईशा व अनंत या तीन मुलांची काळजी घेतली. त्याशिवाय त्या सैफ अली खान आणि करीना कपूर खानचा मुलगा तैमूर याच्याही आया राहिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या त्या अभिनेता राम चरण आणि त्यांची पत्नी कामिनेनी यांची मुलगी क्लीन कारा कोनिडेला हिची काळजी घेत आहेत.