वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. म्हणूनच त्याचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. त्याच्यापासून योग्य अंतर ठेवणे हेही महत्त्वाचे आहे जेणेकरून त्याच्या जीवन वर्तुळात कोणतेही अडथळे येणार नाहीत. जंगल सफारीमध्ये लोकांना आवर्जून सर्वप्रथम वाघ आणि सिंह बघायचा असतो. कधी कधी काही ठिकाणी या जनावराचे रस्त्यावरही दर्शन होते. अशा वेळी अनेक व्हिडीओही शूट केले जातात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक माणूस वाघाच्या मागून चालताना दिसत आहे.
नक्की काय झालं?
या व्हायरल व्हिडीओमध्ये वाघ रस्त्याने चालताना दिसत आहे. त्याच्या मागे एक कार उभी आहे ज्याचा प्रकाश त्याच्या पाठीवर पडताना दिसतो. गाडी वाघाच्या अगदी जवळ आहे.
(हे ही वाचा: बँक लॉकरमध्ये सापडलं ५०० कोटी किमतीचे पन्ना शिवलिंग, आहे १००० वर्षे जुनं)
वाघाच्या मागे चालू लागतो
त्या कारमधला एक माणूस बाहेर येतो आणि तो वाघाच्या मागे चालू लागतो. गाडीत बसलेले लोक पंजाबीत बोलताना ऐकू येतात. कारमध्ये बसलेला एक जण व्हिडीओ बनवतो. तो माणूस नंतर वाघाच्या मागून पोझ देतो आणि व्हिडीओ संपतो.
(हे ही वाचा: थंडी वाजते म्हणून कुत्र्याने केला हटके जुगाड, हा Viral Video एकदा बघाच!)
(हे ही वाचा: शेळीने दिला मानवासारख्या मुलाला जन्म! सोशल मीडियावर फोटो Viral)
नेटीझन्सच्या प्रतिकिया
‘या कामासाठी या व्यक्तीला तुरुंगात टाकावे’, असे युजर्सनी लिहिले आहे. एका यूजरने लिहिले की, ‘ही व्यक्ती मूर्ख आहे, टायगरला हवे असते तर त्याने काही सेकंदात गेम संपवला असता.’ तुम्हाला काय वाटत या व्हिडीओबद्दल?