आंध्र प्रदेशातील धर्मावरम मधील एका विणकराने रामावरची अनोखी भक्ती दाखवली आहे. विणकर जुजारू नागराजू यांनी ६० मीटर लांब आणि ४४ इंच रुंद रेशमी साडी तयार केली आहे. त्यावर त्यांनी १३ भाषांमध्ये ‘जय श्री राम’ लिहिले आहे. ही सिल्क साडी तयार करण्यासोबतच नागराजूने त्यावर ३२,२०० वेळा जय श्री राम लिहिले आहे. देशातील लाखो राम भक्त आपापल्या परीने पूजा करतात. अनेक लोक राम नाम स्मरण आणि राम नाम पुस्तिकेद्वारे दररोज देवाचे ध्यान करतात. ही साडी हाताने विणून नागराजू यांनी रामभक्तीचे आणखी एक दुर्मिळ उदाहरण मांडले आहे.
‘राम कोटी वस्त्रम’ हे आहे नाव
श्री सत्य साई जिल्ह्यातील धर्मावरम येथील हातमाग विणकर नागराजू यांनी या साडीद्वारे रामावरील त्यांची अनोखी भक्ती प्रदर्शित केली आहे. नागराजू यांनी या साडीला ‘राम कोटी वस्त्रम’ असे नाव दिले आहे. ही पाच साडी १९६ फूट लांब आणि ३.६६ फूट रुंद आहे. नागराजू यांनी आपल्या हाताच्या कौशल्याने त्यावर १३ भाषांमध्ये हजारो वेळा ‘जय श्री राम’ लिहिले आहे. रामायणातील सुंदरकांडशी संबंधित भगवान रामाच्या १६८ वेगवेगळ्या प्रतिमाही साडीवर बनवण्यात आल्या आहेत.
(हे ही वाचा: Gold Smuggling: तस्करीसाठी जुगाड! विगमध्ये लपवलं होतं ३० लाखांचे सोनं; विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल)
(हे ही वाचा: KGF Chapter 2: रॉकी भाईची क्रेझ; थेट लग्नपत्रिकेवरच छापला सिनेमाचा डायलॉग!)
किती वेळ लागला?
ही दुर्मिळ साडी बनवण्यासाठी नागराजू यांना चार महिने लागले असून त्यात १६ किलो सिल्कचा वापर करण्यात आला आहे. दररोज तीन जणांनी ते बनवण्यात मदत केली.
(हे ही वाचा: अजगराने अचानक गायीच्या वासरावर केला हल्ला, पाय पकडला आणि…; बघा Viral Video)
अयोध्येत राम मंदिरत देणार भेट
४० वर्षीय नागराजू यांनी ‘राम से बडा राम का नाम’ ची भक्ती ओळखून आपल्या वैयक्तिक बचतीतून १.५ लाख रुपये खर्च केले आहेत. अयोध्येतील राम मंदिराला ते ही साडी भेट देणार आहेत. १३ भाषांमध्ये रामनाम लिहून त्यांनी देशातील विविधतेत एकतेचा संदेशही दिला आहे.