आंध्र प्रदेशात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे NTR जिल्ह्यात पूर आला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णेची उपनदी असलेल्या मुनेरू नदीला वाहू लागल्याने राष्ट्रीय महामार्गावरील (NH 65) वाहतूक विस्कळीत झाली होती आणि जवळपासचे भाग जलमय झाले होते. अशा स्थितीमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम पोलिस करत आहेत. अशाच एका बचाव मोहिमेदरम्यान एका श्वानाच्या पोलिसांचे लक्ष वेधून घेतले. श्वान अस्वस्थ दिसत होते आणि पोलिसांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी श्वानाचा पाठलाग केल्यानंतर ते एका पूरग्रस्त घरात गेले. घराच्या आत त्यांना पुराच्या पाण्यामुळे चिखलात अडकलेले एक पिल्लू दिसले. पोलिसांनी ताबडतोब पिल्लांची सुटका केली, त्यांना स्वच्छ केले आणि पुन्हा त्यांच्या आईशी भेट घडवून आणली..
हृदय पिळवटून टाकणारी ही घटना व्हिडीओमध्ये कैद करण्यात आली आणि आंध्र पोलिसांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्वरीत व्हायरल झाला, प्राणी प्रेमींनी पोलिसांचा कौतुक केले. पोलिसांच्या सहानुभूती आणि मदतीची प्रशंसा केली.
आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरून या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. “#APPolice ने पुराच्या पाण्यात अडकलेल्या पिल्लांची सुटका केली: #NTR(D) मध्ये मोठ्या पुरामुळे श्वानाची पिल्ले घरात अडकली होती. आईचा तिच्या मुलांसाठी होणारा त्रास पोलिसांना कळला. त्यांनी ताबडतोब त्यांची सुटका केली आणि त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या आईकडे आणले आणि माणुसकी दाखवली,” असे कॅप्शनमध्ये लिहले आहे.
हैदराबाद आणि विजयवाडाला जोडणाऱ्या नंदीगामा मंडळातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ (NH 65) च्या बाजूला ही घटना घडली. व्हिडीओमध्ये दिसते की, वाहतूक आणि पूर परिस्थिती नियंत्रित करण्यात गुंतलेल्या आंध्र प्रदेश पोलिस कर्मचाऱ्यांनी रविवारी एनटीआर जिल्ह्यातील इथावरम गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन पिल्लांची सुटका केली.
हेही वाचा – तुम्ही रोज किती लिटर पाणी पिता? सलग १२ दिवस महिलेने प्यायले चक्क ४ लिटर पाणी अन्…. वाचा काय आहे प्रकरण
या घटनेबद्दल सांगताना नंदीगामाचे एसीपी जनार्दन नायडू यांनी पीटीआयला सांगितले की, “शुक्रवारी पूरस्थिती असताना आम्ही महामार्गावरील वाहनांची वाहतूक व्यवस्थापित करत होतो आणि आमच्या डीसीपी अजिता वेजेंदला यांच्या लक्षात आले की एक श्वान आमच्या आजूबाजूला विचित्रपणे रेंगाळत आहे. त्यानंतर त्यांनी आम्हाला तिच्या अडकलेल्या पिल्लांकडे नेले.”
दोन पोलीस आणि एका पोलीस महिलेने त्रासलेल्या श्वानाची अवस्था ओळखली. श्वानाचा पाठलाग करून अधिकारी बंद घराच्या आजूबाजूच्या पुराच्या पाण्यातून गेले. त्यांनी कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी मारली आणि आतून अडकलेल्या दोन पिल्लांची यशस्वीरित्या सुटका केली. श्वानाच्या पिल्लांना स्वच्छ केले आणि काळजी घेतल्यानंतर ते त्यांना पुन्हा पिलांच्या आईजवल सोडले.
हेही वाचा – टोमॅटोमुळे बदलले नशीब, शेतकऱ्याने ४५ दिवसात कमावले ४ कोटी रुपये अन् १.५ कोटींचे कर्जही फेडले
नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी ३ वाजता घरासमोरील भागात पुराचे पाणी शिरले. पुरामुळे आईचा तिच्या पिल्लांशी संपर्क तुटल्यानंतर सुमारे २० तासांनंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांना श्वानाच्या त्रासदायक परिस्थितीची जाणीव झाली.
राज्याचे पोलिस महासंचालक केव्ही राजेंद्रनाथ रेड्डी यांनी विजयवाडा शहर पोलिसांचे या कामाचे कौतुक केले. ही घटना आंध्र प्रदेशातील पोलिस दलाने दाखवलेल्या सहानुभूती आणि दयाळूपणाचे उत्तम उदाहरण आहे.