एका राजकीय नेत्याचा न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये हा राजकीय नेता शर्टशिवाय एका महिलेसोबत व्हिडीओवर कॉलवर असल्याचं दिसत आहे. नंतर व्हिडीओ कॉलवर एका महिलेसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. मात्र, या नेत्याने या व्हायरल व्हिडीओला मॉर्फ व्हिडीओ असल्याचं म्हटलंय आणि या व्हिडीओची प्रयोगशाळेची चाचणी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. मात्र नेत्याच्या या व्हायरल व्हिडीओमुळे त्यांचे विरोधक सातत्याने निशाणा साधत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आंध्र प्रदेशमधल्या युवाजन श्रमिका रिथू काँग्रेस पक्षाचे खासदार (वायएसआरसीपी खासदार) कुरुवा गोरंतला माधव यांचा असल्याचं सांगण्यात येत आहे. एका महिलेसोबत नग्न व्हिडीओ कॉल केल्याचा आरोप या खासदारावर करण्यात आलाय. या व्हायरल व्हिडीओनंतर खासदार गोरंतला माधव यांनी स्वतः समोर येऊन स्पष्टीकरण दिलंय. “माझा व्हिडीओ तेलुगू देसम पक्षाच्या काही नेत्यांनी छेडछाड करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ मॉर्फ केलेला व्हिडीओ असून तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवा. मग हा व्हिडीओ खरा आहे की खोटा हे स्पष्ट होईल.”, असं त्यांनी या स्पष्टीकरणात म्हटलंय.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?

आणखी वाचा : पाण्याखाली वावटळासारख्या घोंघावणाऱ्या माशांचा हा VIRAL VIDEO सर्वांना संमोहित करतोय!

यापुढे बोलताना ते म्हणाले की, ‘मी जिममध्ये वर्कआऊट करत असतानाचा माझा व्हिडीओ काढण्यात आला आणि तो छेडछाड करून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला’, असा दावा या खासदाराने केला आहे. तसंच “माझी बदनामी करण्यासाठी हा प्रकार केला आहे”, असं देखील कुरुवा गोरंतला माधव यांनी म्हटलंय. या घटनेमागील लोकांवर मानहानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे खासदाराचा दावा फेटाळून लावत टीडीपी पक्षाने म्हटले आहे की कुरुवा गोरंतला माधव निर्लज्जपणे वस्तुस्थिती नाकारत आहेत आणि निर्दोष असल्याचा दावा करून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आणखी वाचा : चिप्सच्या पाकिटांपासून पिशव्या आणि बरंच काही! पुणेकर महिलांच्या या सुंदर उपक्रमाचा VIDEO VIRAL

खरं तर, वायएसआरसीपी खासदाराचा हा न्यूड व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला होता जेव्हा तो अज्ञात व्यक्तीने लीक केला होता. व्हिडीओमध्ये ते शर्टलेस असून कॉलच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या एका महिलेसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांचे सल्लागार सज्जला रामा कृष्णा म्हणाले, “वायएसआरसीपी खासदार गोरंतला माधव यांचा व्हिडीओ खरा होता की खोटा, याची चौकशी केली जात आहे. चाचणीत व्हिडीओ खरा आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. गोरंतला माधव यांच्यावर कारवाई केली जाईल.”

आणखी वाचा : चालत्या गाडीच्या खिडकीतून मुलगी पडली, ड्रायव्हरला कळलंच नाही; पुढे काय झालं? पाहा VIRAL VIDEO

गोरंतला माधव हे आंध्र प्रदेशमधील हिंदूपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या खासदाराने ४ ऑगस्ट रोजी सांगितले की त्यांनी सायबर गुन्हे विभाग आणि एसपीकडे तक्रार केली आहे. तक्रारीत दावा करण्यात आला आहे की टीडीपीने आपली प्रतिमा खराब करण्यासाठी नग्न व्हिडीओमध्ये आपला चेहरा टाकला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्ष टीडीपी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.

Story img Loader