नवरात्रीच्या उत्सवात या दिवसांमध्ये मंदिरांमध्ये बरीच गर्दी पाहायला मिळत आहे. या दरम्यान मंदिरांची विशेष सजावट केल्या जातात. अशातच आंध्र प्रदेशातील एका मंदिराची सजावट ही भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. कारण या मंदिरात केलेल्या सजावटीने मंदिरात आलेल्या प्रत्येक भक्ताचे मन मोहित केले आहे. यात तुम्ही ती सजावट पाहून देखील थक्क व्हाल कारण मंदिराला चक्क पाच कोटी रुपयांच्या नोटांनी सजवण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील वासवी कन्याका परमेश्वर मंदिरात देवांना ५.१६ कोटी रुपयांच्या चलनी नोटांनी संपूर्ण मंदिर सजवण्यात आले आहे. हे मंदिर सजावट करताना मंदिरातील १०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी मदत केली आहे. या सजावटीसाठी २०००, ५००, २००, १००, ५० आणि १० रुपयांच्या नोटा वापरल्या गेल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंदिरातील आयोजकांनी चलन नोटांनी बनवलेल्या, ओरिगामी फुलांच्या माला आणि पुष्पगुच्छांनी मंदिरातील गाभारा आणि देवीला सजवले आहे. वेगवेगळ्या रंगांच्या चलनी नोटांनी मंदिराच्या सौंदर्यात भर घातली आहे. हे मन मोहित करणारे सौंदर्य पाहण्याकरिता लोकं मोठी गर्दी करत आहे. मोठ्या संख्येने भक्त नवरात्रोत्सवात धनाची देवी ‘धनलक्ष्मी’ च्या ‘अवतार’ मध्ये देवतेची पूजा करतात. नेल्लोर शहरी विकास प्राधिकरणाचे (NUDA) अध्यक्ष आणि मंदिर समिती सदस्य मुक्कला द्वारकानाथ यांच्या मते समितीने अलीकडेच ११ कोटी रुपये खर्चून मंदिराच्या जीर्णोद्धाराची कामे पूर्ण केले आहे.

तर यावेळी ‘चार वर्षांच्या नूतनीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर हा पहिला उत्सव असल्याने समितीने देवतेला चलनी नोटांनी सजवण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले. समिती सदस्यांनी आणि भक्तांनी या नवीन नोटा गोळा केल्या आणि अनोख्या सजावटीसाठी या कामासाठी १०० हून अधिक कलाकारांची निवड करण्यात आली. दसरा उत्सवाचा भाग म्हणून सात किलो सोने आणि 60 किलो चांदीने देवाला सजवण्याची योजना यावेळी समितीने केली आहे. दरम्यान ही पहिलीच वेळ नाही की, मंदिर चलनी नोटांनी सुशोभित केले गेले आहे. तेलंगणाच्या जोगुलंबा गडवाल जिल्ह्यातील कन्याका परमेश्वरी मंदिर १,११,११,१११ रुपयांच्या चलनी नोटांनी सजवण्यात आले होते. २०१७ मध्ये मंदिर समितीने ३,३३,३३,३३३ रुपयांच्या चलनी नोटांसह अशाच व्यवस्थेत अर्पण केले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andhra pradesh temple decorated with five crore rupees currency notes scsm